31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराष्ट्रीयधनत्रयोदशीला सोने का विकत घेतात? वाचा सविस्तर

धनत्रयोदशीला सोने का विकत घेतात? वाचा सविस्तर

हिंदू सणांचा राजा दिवाळी (Diwali Festival) असल्याचे लहानपणापासून शाळेत शिकवले जायचे. ग्रामीणभागात वसुबारस या दिवसापासून दिवाळी सणाची सुरुवात होते. तर शहरीभागात धनत्रयोदशी या दिवसापासून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी सोने, चांदी (Golden And Silver)  आणि भांड्यांची खरेदी केली जात असून आजचा दिवस शुभ मानला जातो. लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवसांआधी धनतेरस साजरी केली जाते. या दिवशी लोकं धार्मिक कार्यात व्यस्त असून भगवान कुबेर, भगवान धन्वंतरी आणि लक्ष्मी देवीची पूजा करतात. हा सण पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात त्रयोदशी तिथीला साजरा करतात.

आज (१० नोव्हेंबर) दिवशी धनत्रयोदशी (Dhanteras) साजरी केली जात आहे. या दिवशी धनत्रयोदशीचा मुहूर्त हा 12.35 ते 1.57 पर्यंत आहे. तर या सणाच्या पूजेचा मुहूर्त हा संध्याकाळी 5.47 ते 7.43 असेल, असे पंचांगात नमूद केले आहे. प्रदोष काल हा सायंकाळी 5.30 ते 8.8 पर्यंत चालू राहील. तर या दिवशी सोने, चांदी भांडी खरेदीसाठी विशेष मुहूर्त असल्याचे सांगितले जाते.

हे ही वाचा

शनिवारपासून मेट्रोच्या वेळेत वाढ होणार; एकनाथ शिंदे मुंबईकरांना दिवाळी भेट

शेतकऱ्यांच्या मदतीला धावलेल्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याची भावनिक साद

‘सरकार जातीय कोंबडे झुंझावत ठेवतात’

वस्तू खरेदी करण्याचा विशेष मुहूर्त

धनतेरस साजरी करताना लोकं अनेक सोन्या चांदीच्या वस्तू आणि भांडी विकत घेतात. मात्र याचाही एक मुहूर्त असतो. धनतेरसदिवशी 11.43 ते 12.26 पर्यंत हा वेळ सोने, चांदी इतर वस्तू खरेदीसाठी विशेष मुहूर्त आहे. दुपारी 11.59 ते 1.22 या दुसरा मुहूर्त महत्वाचा आहे. तर 4.7 ते 5.30 हा तिसरा मुहूर्त अधिक महत्त्वाचा आहे.

अशी करा पूजा

घराच्या उत्तर दिशेला कुबेर आणि धन्वंतरीची स्थापना करावी. त्यात एक एक तुपाचा दिवा लावावा. कुबेरांना पेढे आणि धन्वंतरीला मिष्ठान्नाचा नैवेद्य द्यावा. पूजा करत असताना ओमही कुबेराय असा जप करावा. त्यानंतर धन्वंतरी स्त्रोत बोला.

या दिवशी यमराजाच्या नावाने 13 दिवे लावावेत. यामुळे अकाली कोणताही मृत्यू होत नाही. असा प्राचीन काळापासून समज असल्याने आजच्या दिवशी दिवे लावावेत. दिवे लावत असताना दक्षिणेकडे जुन्या पद्धतीचा दिवा लावला. दक्षिणबाजू ही यमाची बाजू आहे. यामुळे त्या बाजूला दिवा लावावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी