32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीय'सरकार जातीय कोंबडे झुंझावत ठेवतात'

‘सरकार जातीय कोंबडे झुंझावत ठेवतात’

देशात अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा तसाच कुजवत ठेवला आहे. दरवेळी नवीन सरकार येते आणि मराठा आरक्षणाचे आश्वासन देते. मात्र हातात काहीच लागत नाही. अनेकदा आंदोलकांना आत्महत्येचे पाऊल उचलावे लागत आहे. मराठा समाजाला गेली अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी सरकारकडे मागणी करावी लागत आहे. सध्याची परिस्थीती पाहता मनोज जरांगे-पाटीलांनी मागील दोन महिन्यात दोनदा उपोषण केले मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायमुर्तींना उपोषणास्थळी पाठवून उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. जर या सरकारला खरच जर आरक्षण द्यायचे असते तर लगेच आरक्षण दिले असते. मात्र कोणतीच भूमिका सरकार घेत नसल्याचा विरोधकांचा दावा आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) सध्याच्या आरक्षणाच्या प्रकरणावरून सरकारला फटकारले आहे.

आरक्षणाचा मुद्दा केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात आहे. राज्यातील सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नसल्याचा विरोधकांचा दावा आहे. राज्यात आंदोलन, उपोषण घेऊनही सरकार काहीच करत नाही. यावरून कायदा सुव्यवस्था हाताबाहेर चालला आहे. आमदार सुरक्षित नाहीत. राज्याच जाळपोळ सुरू आहे. एवढे सर्व होऊनही सरकार आरक्षण का देत नाही. त्याचप्रमाणे निवडणुकांच्या तोंडावर सरकार आरक्षण देण्याचे आश्वासन देत असून काम करत नाही. यावरूनच आता जितेंद्र आव्हाडांना नितीश कुमारांनी (NitishKumar) केलेल्या कामचा हेवा वाटू लागला आहे.

हे ही वाचा

‘या’ व्हिडीओत पुणे पोलीस नक्की करतात काय? सुषमा अंधारेंचा सवाल

यंदा कंदिलांवर राजकीय नेत्यांचीच चलती!

अजित पवार गटातील २० हजार प्रतिज्ञापत्रांत त्रुटी, शरद पवार गटाचा गंभीर आरोप

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जातीनिहाय जनगणना केली आहे. त्यानंतर त्यांनी आरक्षणासाठीचा मुद्दा विधानसभेत मांडला आहे. ज्याला करायचे आहे तो कोणत्याही परिस्थितीत करतो. आपण नुसते आरक्षणाच्या गप्पा करतो. जातीय कोंंबडे झुंझवत ठेवतो. आपले राजकारण साधतो, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर केली आहे. निवडणुकांपूर्वी कोण ओबीसी?, कोण मागासवर्गीय? असे मुद्दे उपस्थित होतात आणि वातावरण गरम करून जातात. मात्र मुळ मुद्दा जितल्या तिथे राहतो,अशी टीका आता जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी