33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराष्ट्रीयUnited Nations Security Council : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी भारताला...

United Nations Security Council : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी भारताला फ्रान्सचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी स्थान मिळण्यासाठी पाठिंबा वाढत आहे. भारताला स्थायी सदस्यत्त्वासाठी आता युके नंतर फ्रान्सने देखील पाठिंबा जाहीर केला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी स्थान मिळण्यासाठी पाठिंबा वाढत आहे. भारताला स्थायी सदस्यत्त्वासाठी आता युके नंतर फ्रान्सने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुरक्षा परिषदेत संबोधित करताना फ्रेंच उपप्रतिनिधी नॅथली ब्रॉडहर्स्ट एस्टिव्हल म्हणाल्या, फ्रान्स कायमस्वरूपी जागेसाठी कायम सदस्य म्हणून जर्मनी, ब्राझील, भारत आणि जपानच्या उमेदवारांना समर्थन जाहीर केले आहे.

यूकेने देखील संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षापरिषदेत भारताला स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला होता. संयुक्त राष्ट्रातील ब्रिटनच्या राजदूत बार्बरा वुडवर्ड यांनी म्हटले होते की, आम्ही भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझीलसाठी नवीन कायमस्वरूपी जागा निर्माण करण्यास तसंच परिषदेवर कायम आफ्रिकन प्रतिनिधीत्वास समर्थन देतो.
युकेच्या पाठोपाठ आता फ्रान्सने देखील संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. सुक्रवारी फ्रान्सच्या उपप्रतिनिधी नॅथली ब्रॉडहर्स्ट एस्टिव्हल सुरक्षा परिषदेत म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षापरिषदेत कायमस्वरूपी सदस्य म्हणून जर्मनी, ब्राझील, भारत आणि जपानच्या उमेदवारांना फ्रान्स समर्थन देईल. आम्हाला परिषदेच्या स्थायी सदस्यांसह आफ्रिकन देशांचे अधिक प्रतिनिधित्व हवे आहेत.

सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात. मेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन ही पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत. तर कोलंबिया, भारत, जर्मनी, पौर्तुगाल, दक्षिण आफ्रिका, अझरबैजान, ग्वातेमाला, मोरोक्को, पाकिस्तान, टोगो ही राष्ट्रे अस्थायी सदस्य आहेत. संयुक्त राष्ट सुरक्षा परिषद जागतिक शांतता, वादग्रस्त आंतरराष्ट्रीय मुद्यांची सोडवणूक, तसेच एखादा देश अति आक्रमक भूमिका घेत असल्यास अशा देशाविरोधात आर्थिक निर्बंध किंवा लष्करी कारवाई करण्याचे काम करतो. सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व मिळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भारत प्रय्तनशील आहे, पण भारताला अद्याप कायम सदस्यत्व मिळालेले नाही.

हे सुद्धा वाचा :
Ambadas Danve: संदीपान भुमरेंचे मनी लाँड्रींग, दारूची नऊ दुकाने !; अंबादास दानवेंचा आरोप

VIDEO : शरद साखर कारखान्यात होतोय आर्थिक गैरव्यवहार : अंबादास दानवे

Mumbai Mahanagarpalika : मुंबईसाठी नुसत्याच विकासाच्या गप्पा; शौचालयांअभावी महिलांची कुचंबना

भारत प्रथम १९५०-५१ मध्ये ‘यूएनएससी’चा तात्पुरता सदस्य झाला. त्यानंतर १९६७-६८, त्यानंतर १९७२-७३, १९७७-७८, १९८४-८५, १९९१-९२ आणि २०११-१२ मध्ये भारत तात्पुरता सदस्य म्हणून निवडला गेला. त्यानंतर 1 जानेवारीपासून भारत पून्हा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत तात्पूरता सदस्य झाला आहे. भारत गेल्या अनेक वर्षांपासून कायम सदस्यत्वासाठी प्रयत्नशील असून भारताचे शेजारी राष्ट्र चीनने याबाबत कायमच भारताला विरोध केलेला आहे. संयुक्त राष्ट्रातील चीनने आपले स्थान बळकट केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी