29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयशरद पवारांच्या ओठात काय, पोटात काय?; इंडियाच्या उद्याच्या बैठकीकडे लक्ष

शरद पवारांच्या ओठात काय, पोटात काय?; इंडियाच्या उद्याच्या बैठकीकडे लक्ष

इंडिया आघाडीच्या ३१ ॲागस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. असे असताना अशी आघाडी निर्माण करण्यात देश पातळीवर पुढाकार घेणाऱ्या शरद पवार यांच्या गेल्या महिन्याभरातील संशयास्पद हालचाली पाहता, शरद पवारांच्या ओठात काय, पोटात काय? याचा अंदाज या आघाडीतल्या कोणालाच लागत नाही, त्यामुळे त्याच्याविषयीचे संशयाचे धुके कायम आहे. अजित पवार यांनी भाजपशी सोयरीक केल्यानंतर ते दोनदा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांना आपल्या मंत्र्यांसह भेटतात काय, काका पुतणे बंद खोलीत खलबते करतात काय, पुण्यात एका व्यवसायिकाच्या घरात हे काका- पुतणे भेटतात काय, सारेच काही अगम्य वाटत आहे. त्यामुळेच की काय इंडियाच्या मुंबईतील बैठकीत पवार आपल्या पक्षात सध्या चालले आहे, यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट करतात का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपा सरकारविरोधात देशातील २८ पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांनी आपले वजन वापरले. त्यामुळेच की काय, कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे पूर्वेपासून पश्चिमेकडचे, दक्षिणपासून उत्तरेकडच्या भाजपा विरोधी नेत्यांची मोट बांधण्यात शरद पवार यशस्वी झाले. बिहार, बंगलोर येथे इंडियाच्या दोन बैठका पार पडल्यानंतर आता मुंबईत बैठक होत आहे. मुंबईच्या बैठकीचे यजमानपद शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.

हे सुद्धा वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाळकरी मुलींनी बांधली राखी
एकनाथ शिंदेंच्या होम ग्राउंडमधील प्रकार; ठाण्यात परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसवले!
चीनचा अरुणाचल प्रदेश, अक्साई चीनवर पुन्हा दावा; सीमाप्रश्न पुन्हा चिघळणार

या बैठकीत मोदी सरकार विरोधात लढण्यासाठी काय रणनीती आखता येईल यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा झेंडा निश्चित केला जाणार असून त्याच्याखाली आगामी लोकसभा निवडणुका लढवल्या जाणार आहेत. राज्य स्तरावर त्या त्या पक्षांना जागा वाटपांचे अधिकार द्यायचे की कसे, निवडणुकीत केंद्र सरकारच्या कोणत्या धोरणावर टीका करायची याबाबत विचार विनिमय होणार आहे. या बैठकीचे यजमान पद शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व देश पातळीवर बिंबवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होणार आहे. दरम्यान, शरद पवार की अन्य या इंडिया आघाडीचा निमंत्रक होणार याबाबत एकमत झाले नाही. असे असतानाच शरद पवार नक्की काय भूमिका घेतात, भाजपला पूरक असणारी ‘पुतण्या वाचवा’ मोहीम हाती घेतात की मोदी सरकार विरोधात आघाडी उघडतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी