30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराष्ट्रीयआज जन्माष्टमी, भारतीयांसाठी जन्माष्टमीचं महत्त्व जाणून घ्या.. 

आज जन्माष्टमी, भारतीयांसाठी जन्माष्टमीचं महत्त्व जाणून घ्या.. 

हिंदू धर्मात भगवान कृष्णाचा जन्म सण म्हणून साजरा केला जातो. द्रिक पंचांग नुसार बुधवारी देशभरात कृष्ण जन्माष्टमी मोठया थाटामाटात साजरी केली जात आहे. दुसऱ्या दिवशी देशभरात गोविंदा दहीहंडी हा सार्वजनिकरित्या साजरा करणार आहेत. ग्रेगोरियन कॅलेंडरमधील ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यांत कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.
भारतीय परंपरेत कृष्ण जन्माष्टमीचं महत्व –
भगवान कृष्णाचा जन्म साजरा कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. कृष्ण विष्णू देवाचा आठवा अवतार समजला जातो. द्रिक पंचांग नुसार, बहुतेक वेळा कृष्ण जन्माष्टमी सलग दोन दिवस साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, कृष्ण जन्माष्टमी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी येतो.
कृष्णाचा जन्म उत्तर प्रदेशातील मथुरा येथे झाला. कंसाचा विनाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी कृष्णाचा अवतार घेतला. कंस हा दुष्ट राजा होता. त्याचे आपली बहीण देवकीवर खूप प्रेम होते परंतु देवकीच्या पोटीच त्याचा काल जन्म घेणार असल्याचे समजताच कंसाने आपली नवविवाहित देवकी आणि तिचा पती वासुदेवाला कारावासात टाकले. कंसाने एका मागो माग एक देवकीचे सात पुत्र मारले. वासुदेवाने आपला आठवा पुत्र वाचवला. भर रात्रीत यमुना नदी पार करत गोकुळात यशोदा आणि नंद या जोडप्यांच्या घरी सर्वजण गाढ झोपेत असताना त्यांनी आपल्या पुत्राला पाळण्यात ठेवले. यशोदानंद पुढे कृष्ण म्हणून ओळखला जाऊ लागला. मोठा झाल्यानंतर कृष्णाने कंसाला तर ठार केलेच पण महाभारतही घडवले.
हे ही वाचा 
दृष्ट कौरवांचे नामोहरण करण्यासाठी कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य स्वीकारले. पांडवांना महाभारतात युद्ध जिंकवून देण्यासाठी कृष्णाने महत्त्वाची भूमिका पार पडली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी