32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराष्ट्रीयराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; लोकसभा खासदाराचे सदस्यत्त्व रद्द

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का; लोकसभा खासदाराचे सदस्यत्त्व रद्द

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) आज मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या एका खासदाराला अपात्र करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयाने दिली आहे. त्यामुळे लोकसभेतील (Lok Sabha MP) पक्षाचे संख्याबळ देखील घटले आहे. राष्ट्रवादीचे लोकसभेत सहा खासदार आहेत. त्यातील एका खासदारावर आता अपात्रतेची कारवाई केल्यामुळे लोकसभेत राष्ट्रवादीचे आता पाच खासदार असणार आहेत. लक्षव्दीपमधील राष्ट्रवादीचे खासदार मोहमंद फैजल (Mohammad Faizal) यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यामुळे हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  (NCP Lok Sabha MP Mohammad Faizal Membership canceled)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. त्यामुळे इतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी इतर राज्यांतून देखील काही सदस्य लोकसभेवर निवडून जावे लागतात. लक्षव्दीप मतदार संघावर शरद पवार यांनी लक्ष केंद्रीत केल्यामुळे तेथून राष्ट्रवादीचे मोहम्मद फैजल हे लोकसभेवर निवडूण आले होते. मात्र एका खूनाच्या प्रकरणात फैजल यांना न्यायालयाने शिक्षा दोषी ठरविल्यामुळे लोकसभा सचिवालयाने फैजल यांना अपात्र करत त्यांचे लोकसभा सदस्यत्त्व देखील रद्द केले आहे.

मोहम्मद फैजल यांना एका २००९ सालीने खुनाच्या प्रयत्न केल्याच्या एका प्रकरणात न्यायालयाने १० वर्षेंची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांच्यासह सह आरोपींच्या जामीनाला देखील स्थगिती दिल्याने फैजल सध्या कारागृहात आहेत. दरम्यान फैजल यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद आणि त्यांचे जावई मोहम्मद सलिया यांच्या गंभीर मारहाण मारहाण करण्यात आल्याचा आरोप फैजल यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर फैजल आणि इतर काही जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

मनसे कार्यकर्त्यांमुळे उत्तर भारतीयांना त्रास, पण आता ते दिवस संपले…

‘स्वराज्य कनिका-जिऊ’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; ईश्वरी देशपांडे जिजाऊ माँ साहेबांच्या भूमिकेत

What An Idea : 500 स्क्वेअर फुटाचे एका बॉक्समध्ये फोल्ड करून कुठेही नेता येणारे अनोखे घर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशातील काही छोट्या राज्यांमध्ये चांगली संघटनबांधणी आहे. केरळमध्ये सध्या सत्ताधारी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. तर लक्षव्दीपमध्ये देखील पक्षाचे गेल्या काही वर्षांपासून चांगले संघटन आहे. या मतदार संघातून मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र आता त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व देखील रद्द झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी