30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयमनसे कार्यकर्त्यांमुळे उत्तर भारतीयांना त्रास, पण आता ते दिवस संपले...

मनसे कार्यकर्त्यांमुळे उत्तर भारतीयांना त्रास, पण आता ते दिवस संपले…

उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत (Ayodhya) राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पाऊल ठेवू देणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला प्रखर विरोध करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार बृजभूषण सिंग (Brujhushan Sing) यांनी या मुद्द्यावर काहीसे नमते घेतल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपशी झालेली सलगी पाहता बृजभूषण सिंग यांचा राज ठाकरेंवरचा राग मावळल्याचे त्यांच्या बदलेल्या राजकीय भूमिकेवरून स्पष्ट होत आहे. राज ठाकरे यांना माझा वैयक्तिक विरोध नाही पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना खूप त्रास दिला होता. परंतु आता ते दिवस संपले आहेत, असे वक्तव्य बृजभूषण सिंग यांनी केले आहे. (BJP MP Brujbhushan Sing say’s I have no personal opposition to Raj Thackeray)

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी बृजभूषण सिंग पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या विरोधातील भूमीबाबत विचारले असता ते म्हणाले,”राज यांनी माझा व्यक्तिशः विरोध नाही. पण त्यावेळी मी जी भूमिका मंडळी होती ती भूमिका जुनी झाली आहे.” बृजभूषण सिंग हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राकडून आपल्याला नेहमीच प्रेम मिळाले. त्यामुळे मी महाराष्ट्रातील जनतेचा आभारी आहे. आपल्या या दौऱ्याला महाराष्ट्रातून विरोध झाला नाही याबद्दल मी येथील जनतेचा आभारी असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

हे सुद्धा वाचा  

चंद्रकांत दादा म्हणतात, एकही देव ‘बॅचलर’ नाही; मारुतीराया सविस्तर चर्चेसाठी भेट घेणार!

प्रवाशांसाठी खुशखबर! एकाच कार्डवर करा मोनो, मेट्रो, रेल्वे आणि बसमधून प्रवास

रामचरितमानस ही मनुस्मृतिइतकीच द्वेष पसरविणारी रचना; बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचा माफी मागण्यास नकार

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम विजेता कोण ठरणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मॅट विभागात नांदेडचा शिवराज राक्षे तर नाशिकचा हर्षवर्धन सदगीर या दोघांमध्ये रंगतदार सामना होणार आहे. तर माती विभागात पुण्याचा महेंद्र गायकवाड आणि सोलापुरचा सिकंदर शेख या दोघांमध्ये अंतिम लढत होणार आहे. मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील कुस्ती परिषदचे अध्यक्ष राहिले आहेत. तर तुम्ही त्यांना भेटणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, कार्यक्रम कसा आहे याबाबत मला माहिती नाही. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात जी भूमिका घेतली होती त्या पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंग यांनी ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर राज यांना आपला हा दौरा रद्द करावा लागला होता. त्यामुळे सिंग यांना पुण्यात येण्यास मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अटकाव करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी