27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeराष्ट्रीय‘मोदी चोर’वरुन शिक्षेविरोधात राहुल गांधी यांचे अपील; सुरत कोर्टात सोमवारी सुनावणी

‘मोदी चोर’वरुन शिक्षेविरोधात राहुल गांधी यांचे अपील; सुरत कोर्टात सोमवारी सुनावणी

सुरतचे मुख्य न्यायदंडाधिकारी एच.एच. वर्मा यांनी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून 23 मार्च रोजी राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली होती. कोर्टाने 15,000 रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला. शिक्षेवर अपीलासाठी राहुल यांना परवानगी दिली गेली. त्यासाठी शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान, राहुल यांना तडकाफडकी खासदार म्हणूनही लोकसभेत अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांचे दिल्लीतील निवासस्थानही खाली करून घेतले जात आहे.

‘मोदी आडनावाची माणसे चोर असतात,’ या व्यक्तव्याबद्दल दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावणाऱ्या सुरत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे अपील दाखल झाले आहे. त्यावर सुरत कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

सुरतचे मुख्य न्यायदंडाधिकारी एच.एच. वर्मा यांनी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून 23 मार्च रोजी राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली होती. कोर्टाने 15,000 रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला. शिक्षेवर अपीलासाठी राहुल यांना परवानगी दिली गेली. त्यासाठी शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान, राहुल यांना तडकाफडकी खासदार म्हणूनही लोकसभेत अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांचे दिल्लीतील निवासस्थानही खाली करून घेतले जात आहे.

राहुल गांधी यांनी मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेल्या दंडाधिकार्‍यांच्या आदेशाविरोधात सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिली. त्या याचिकेवर सोमवारी सुरत कोर्टात सुनावणी होणार आहे.

मोदी चोर प्रकरणात सुरत कोर्टात उपस्थित राहिलेले राहुल गांधी Modi Thieves Remark Rahul Gandhi Appears In Surat Court
मोदी चोर प्रकरणात न्यायमूर्ती एच. एच. वर्मा यांच्या सुरत कोर्टात उपस्थित राहिलेले राहुल गांधी (फाईल फोटो : सौजन्य गुगल)

राहुल गांधींना दोषी ठरविण्याच्या प्रकरणावर काँग्रेसची कायदेशीर टीम काम करत असल्याचे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारीच सांगितले होते. पक्ष ‘राजकीय आणि कायदेशीररित्या’ या प्रकरणाचा सामना करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले होते. राहुल गांधींना ‘‘अतिशय घाई-घाईने’’ अपात्र ठरवल्याबद्दल खरगे यांनी केंद्र सरकारवर टीकाही केली होती. भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत केलेल्या वक्तव्याबद्दल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता . “सर्व चोरांना मोदी हेच आडनाव कसे काय?” त्यांनी भाषणादरम्यान विचारले.

दुसरीकडे, आणखी एका अशाच प्रकरणात राहुल गांधी यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. 2019 मधीलच एका टिप्पणीसाठी सुशील कुमार मोदी यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यात पटना न्यायालयाने 12 एप्रिल रोजी राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

 

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 13 एप्रिल, 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे केलेल्या भाषणाशी संबंधित हे सारे प्रकरण आहे. ‘‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे असते,’’ असा प्रश्न राहुल यांनी या प्रचारसभेत विचारला होता. भाषणात पुढे त्यांनी ललित मोदी आणि नीरव मोदी यांची नावे घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव घेतले होते. त्याविरोधात पूर्णेश मोदी यांनी दुसऱ्या दिवशी सुरत न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात मोदी आडनावाच्या माणसांची बदनामी केल्याचा आरोप ठेवून तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणात पहिली सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एच. कपाडिया यांनी घेतली. राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर राहून दोषी नसल्याचे म्हटले होते. नंतर या प्रकरणात न्यायाधीश बदलले. ए.एन. दवे यांनी सूत्रे स्वीकारली. त्यांनी साक्षी नोंदविल्या. त्यांनंतर फिर्यादी पूर्णेश मोदी यांनी अतिरिक्त साक्षी तपासण्यासाठी दिलेला अर्ज न्यायमूर्ती दवे यांनी नाकारला. त्याविरोधात फिर्यादी हायकोर्टात गेला. हायकोर्टाने अतिरिक्त साक्षी तपासण्यास मंजूरी दिली. त्या तपासून न्या. दवे खटल्याचा निकाल देणार, त्याच्या दोन दिवस आधी पुन्हा फिर्यादीने कोर्टात नव्याने अर्ज-फाटे केले. ते फेटाळल्यानंतर फिर्यादी मोदी 7 मार्च 2022 रोजी पुन्हा हायकोर्टात गेले. त्यांचे अपील लगेच दाखल करून घेतले गेले आणि त्याच दिवशी सुनावणी होऊन कोर्टाने दवे यांच्या खालच्या कोर्टाला कामकाजावर स्टे दिला. त्यामुळे फक्त निकाल यायचा बाकी असलेला खटला लटकला.

हे सुद्धा वाचा : 

राहुल गांधी म्हणाले, RSS-BJPवाले माझे गुरु; भारत जोडो यात्रा यशस्वी केल्याबद्दल मानले भाजप, संघाचे आभार !

डरो मत : राहुल गांधी माफी मागणार तर नाहीच, परंतु पेन्शन सुद्धा घेणार नाहीत!

निरव मोदी, ललित मोदी, गौतम अदानी या चोरांना चोर म्हटल्यास गुन्हा ठरतो का; नाना पटोलेंचा मोदींना सवाल

खटल्याला उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाच 7 मे 2022 रोजी फिर्यादी पूर्णेश मोदी यांच्या सततच्या त्याच त्या विनंती फेटाळणाऱ्या न्यायमूर्ती दवे यांची बदली केली गेली. सुरत ट्रायल कोर्टात दवे यांच्या जागी एच.एच. वर्मा यांनी जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून 16 फेब्रुवारीपर्यंत हे प्रकरण तसेच लटकलेले राहिले. फिर्यादीने हायकोर्टातील याचिका मागे घेतल्यानंतर खटल्याची स्थगिती निकाली निघाली. त्यांनंतर न्या. वर्मा यांनी 21 फेब्रुवारीपासून अंतिम युक्तिवाद सुरू करून 17 मार्चपर्यंत युक्तिवाद संपविला. 23 मार्च रोजी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बदललेले न्या. वर्मा यांनी शिक्षा सुनावली. वर्मा यांना अलीकडच्या काळात दोन बढत्या मिळाल्याचे सांगितले जात आहे.

Rahul Gandhis appeal filed, Modi surnamed men thieves, hearing on Monday, Surat court punishment, Kolar rally Surat conviction

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी