33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराजकीयअखेर ईडीने किरीट सोमय्यांचा हट्ट पुरविला !

अखेर ईडीने किरीट सोमय्यांचा हट्ट पुरविला !

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्यावर दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) आरोप केले होते. गेले अनेक महिने किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यातच आज सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रीग प्रकरणी साई रिसॉर्ट जप्त केले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या पाठपूराव्याला यश आले आहे. (ED seizes Sai Resort, which allegedly accused Anil Parab)

सक्तवसुली संचालनालयाने याबाबत ट्विटरव्दारे माहिती दिली असून दापोली येथील साई रिसॉर्ट हि १० कोटी २० लाख रुपयांची संपत्ती तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 42 गुंठे जमीन आणि तेथे बांधलेले साई रिसॉर्टचा समावेश आहे.


पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने केलेल्या तक्रारीनंतर ईडीने या प्रकरणी तपास सुरू केला आहे. दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाई नंतर याप्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे. याप्रकरणी मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील अनिल परब म्हणाले. याआधी मी किरीट सोमय्या यांच्या विरोधात न्यायालयात अब्रूनूकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याचा निकाल आल्यानंतर सगळ्यांनाच त्याची किंमत मोजावी लागणार आहे, तसेच ईडीने केलेल्या कारवाईबाबत रिसॉर्टचे मालक सदानंद कदम हे योग्य ती पावले उचलतील. असे देखील यावेळी परब म्हणाले.

याबाबत किरीट सोमय्या यांनी देखील ट्विट केले असून त्यांनी म्हटले आहे की, ”शेवटी अनिल परब यांचा हिशोब सुरू झाला आहे. ईडीने अनिल परब यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. आता अनिल परब यांची सपत्ती जप्त होत आहे. त्यानंतर अनिल परब देखील” तसेच आणखी एका ट्विटमध्ये सोमय्या यांनी ईडीने याप्रकरणी काढलेल्या प्रेसनोटचा देखील फोटो टाकला आहे.

हे सुद्धा वाचा

नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदींचा मोठा कार्यक्रम!

मुंबई पोलीस दलात ‘विशेष पोलीस आयुक्त’ पदाची निर्मिती, पहिला मान देवेन भारती यांना!

आंबेडकरवादी नेते जोगेंद्र कवाडे एकनाथ शिंदे यांच्या कळपात; आता महाराष्ट्रभर घेणार सभा

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी