29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमुंबईमहागाई आणि बेरोजगारीसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष, भोंग्यांसारख्या निरुपयोगी विषयांना अनावश्यक महत्त्व : राष्ट्रवादी

महागाई आणि बेरोजगारीसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष, भोंग्यांसारख्या निरुपयोगी विषयांना अनावश्यक महत्त्व : राष्ट्रवादी

टीम लय भारी 

मुंबई: २०१४ पासून  देशात मोदी सरकार सत्तेत आले. मात्र देशातील बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला येऊन महागाईने उच्चांक गाठला आहे. सध्या बेरोजगारीचा दर ७.८३ टक्क्यावर पोचला आहे. मात्र भोंग्यांसारख्या निरुपयोगी विषयांकडे जनतेचे लक्ष वेधून अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण प्रश्नातून केंद्रसरकारची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते महेश तपासे यांनी मोदी सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षातील कोरोनाचे संकट आणि दिवसेंदिवस देशातंर्गत वाढत असलेल्या महागाईमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास विलंब होत असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत असेही महेश तपासे म्हणाले.

अलीकडेच, देशाची अर्थव्यवस्था सावरायला १२ वर्षे लागतील अशी चिंता आरबीआयने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. त्यामुळे महेश तपासे यांनी नको ते विषय काढून महागाई व बेरोजगारीकडे दुर्लक्ष करणार्‍या केंद्रसरकावर टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा:

देवेंद्र फडणवीस यांच्या तीन वर्षापूर्वीच्या तक्रारीचे काय? राष्ट्रवादी नेत्यांनी उभे केले नवे प्रश्न

On Jodhpur Violence, Rajasthan CM Gehlot Says BJP Targeting State

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी