29 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeराजकीयगोमूत्र शिंपडणारे समोर असते, तर तेच गोमूत्र कोल्ड्रिंक सारखे पाजले असते :...

गोमूत्र शिंपडणारे समोर असते, तर तेच गोमूत्र कोल्ड्रिंक सारखे पाजले असते : निलेश राणे

टीम लय भारी

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी (ता.19) दादर येथील शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून आपल्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केली होती. यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या ठिकाणाचे गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण केले होते. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला खडेबोल सुनावले आहे (Nilesh Rane has slammed Shiv Sena).

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर ते कोण आडवे येणार होते त्यांच्यातला एक सुद्धा दिसला नाही. धमकीची वार्ता राणेंसोबत करायची नाही. आम्ही धमक्यांना भीक घालत नाही. आम्ही निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडले, समोर असते, तर तेच गोमूत्र कोल्ड्रिंक सारखे घशात घालून पुढे निघालो असतो. औकातीत राहायचे असे ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेला खडेबोल सुनावले आहेत.

नितेश राणेंचे उदार धोरण, सरपंचांचा उतरवला विमा

बाटग्यांवरुन सामन्यातील राऊतांच्या अग्रलेखाला प्रत्युत्तर देत नितेश राणे म्हणाले…

शुद्धिकरण करायचे असेल तर शिवसेनेचे करा

नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून गेल्यानंतर, शिवसैनिकांनी स्मृतिस्थळाच्या ठिकाणाचे गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण केले होते. पण शुद्धीकरण करायचे असेल तर आता ते शिवसेनेचे करावे लागेल, अशा खोचक शब्दांत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता.

Nilesh Rane has slammed Shiv Sena
नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात केली होती

बाळासाहेबांनी युंडूगुंडू विरोधी मोहीम हाती घेतली आणि शिवसेनेची स्थापना झाली

The new Shiv Sena is more a natural ally of Congress than BJP

नारायण राणे यांच्या येण्याने हा परिसर अशुद्ध झाला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी येथे येत स्मृतिस्थळ गोमुत्र शिंपडून, तसेच दुधाचा अभिषेक करत त्याचे शुद्धिकरण केले. नारायण राणे यांच्या येण्याने हा परिसर अशुद्ध झाला होता, असे शिवसैनिक म्हणाले होते (With the arrival of Narayan Rane, this area was polluted).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी