33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईपर्यावरण मंत्र्यांच्या हट्टामुळे पैशांचा गैरवापर होतोय , मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल...

पर्यावरण मंत्र्यांच्या हट्टामुळे पैशांचा गैरवापर होतोय , मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना नितेश राणेंनी धाडले पत्र

टीम लय भारी

मुंबईभाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे सतत माहाविकास आघाडीच्या नेत्यावर टिका, आरोप हे करतच असतात. अशातच आता मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना भाजप आमदार निलेश राणेंनी पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, मुंबईला पर्यटनाच्यादृष्टीने सुशोभित करून पर्यटनकांना आकर्षित केलेच पाहिजे, ही आमचीपण भूमिका आहे पण असे करताना कुठल्याही अवैध कार्यपद्धतीने जनतेच्या पैशाचा गैरवापर होता कामा नये हे पाहण्याची सर्वस्वी जबाबदारी MRTP कायदयाने आपल्यावर टाकली आहे.(Nitesh Rane Letter sent to Mumbai Commissioner Iqbal Singh Chahal)

दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेच्या वतीने नवीन प्रेक्षक गॅलरी (Viewing Gallery) उभारण्याचे काम सुरू आहे. (BJP MLA Nitesh Rane) या गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणारी पालिकेची पर्जन्य जलवाहिनी आहे. याच पर्जन्य जलवाहिनीच्यावर सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्यात येत आहे.(Mumbai Commissioner Iqbal Singh Chaha)

सदर पक्के बांधकाम कुठलेही CRZ नियमांतर्गत परवानगी न घेता समुद्रातून पिलर्स बांधून केले गेले आहे. त्यामुळे समुद्रातील जैवविविधतेला नुकसान झाले आहे. आणि भविष्यात त्यामुळेच ग्रीन ट्रॅब्युनलकडून (NGT) दंडपण आकारला जाईल.

या पत्रातून भाजप आमदार निलेश राणेंनी (BJP MLA Nitesh Rane) मुंबईच्या आयुक्तांना विनंती केली. MRTP व CRZ ACT प्रमाणे कारवाई करावी अन्यथा मला MRTP ACT कलम 56 (A) अंतर्गत संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई संबंधी न्यायलयात दाद मागावी लागेल.

काय आहे प्रेक्षक गॅलरी ?

दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर पालिकेच्या वतीने नवीन प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे. या प्रेक्षक गॅलरीचे शुक्रवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. येत्या तीन महिन्यांत ही दर्शक गॅलरी तयार होणार असून या गॅलरीत उभे राहून पर्यटकांना मरिन ड्राइव्हवरील ‘राणीचा रत्नहार’देखील न्याहाळता येणार आहे.

हे सुध्दा वाचा :

Nitesh Rane: आमदार नितेश राणेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

Nilesh Rane : ‘कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा शिल्लक राहिली आहे का’ : नीलेश राणे

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी