27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनवे पालकमंत्री : धनंजय मुंडेंकडे परभणी, तर तनपुरेंकडे गोंदीया

नवे पालकमंत्री : धनंजय मुंडेंकडे परभणी, तर तनपुरेंकडे गोंदीया

टीम लय भारी

मुंबई:  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिल्व्हर ओक येथे महत्त्वाची बैठक पार पडली आहे. सदर बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या खात्याचा पदभार हा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे देण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर गोंदियाच्या पालकमंत्रिपदी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची निवड करण्यात आली आहे.

सदर बैठकीस राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे,  छगन भुजबळ यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे बैठकीला हजर होत्या. नवे पालकमंत्री म्हणून परभणीसाठी धनंजय मुंडे याचे नाव देण्यात आले आहे. तर गोंदियासाठी प्राजक्त तनपुरे यांचे नाव दिले आहे, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी