29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयरश्मी ठाकरेंच्या बंधूंची ६. ४५ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

रश्मी ठाकरेंच्या बंधूंची ६. ४५ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

टीम लय भारी

ठाणे: ई़डीने आज मुख्यमंत्री(CM) उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची पत्नी सौ.रश्मी ठाकरे( Rarshi Thackeray) यांचा भाऊवर म्हणजे श्रीधर पाटणकर(Shreedhar Pathnakar) यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन कंपनी(pushpak bullion company) हि ठाकरें परिवारांचा संबंधितली कंपनी आहे, आणि याच प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता ६.४५ कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील ११ सदनिक समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत.

ईडीची( Enforcemen Directorate)ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने २०१७ मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा(Money Laundering Case) गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल २१ कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती.

ईडीने आज प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिलीय. ६ मार्च २०१७ मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. २०१७ मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या पत्नीचा भाऊ म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी