31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयअमित शहांचे सुक्षाकवच तोडणाऱ्या 'त्या' तरुणाची ओळख पटली

अमित शहांचे सुक्षाकवच तोडणाऱ्या ‘त्या’ तरुणाची ओळख पटली

अमित शहा हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. परंतु असे असतांना एक तरुण सुरक्षा कवच तोडून त्यांच्या भोवती घुटमळ होता. त्याची ओळख पटली आहे.

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबईत आले होते. यावेळी‍ त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यामुळे या घटनेची मोठी चर्चा झाली. यावेळी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. अमित शहा हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. परंतु असे असतांना एक तरुण सुरक्षा कवच तोडून त्यांच्या भोवती घुटमळ होता. त्याची ओळख पटली आहे. तो तरुण धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ गावचा आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याने आपण आंध्र प्रदेशमधील एका खासदारचे पीए असल्याचा दावा केला आहे. त्या तरुणाचे नाव हेमंत पवार असल्याची माहिती समोर आली आहे.

अमित शहांचे सुक्षाकवच तोडणाऱ्या 'त्या' तरुणाची ओळख पटली

सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी त्या तरुणाला अटक केली होती. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या पूर्वी हा तरुण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आण‍ि देवेंद्र फडणवीस यांच्या  निवास्थानाबाहरे ब्लेझर घालून फ‍िरतांना दिसल्याची माहिती देखील समोर आली आहे. अमित शहा हे 4 आण‍ि 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्याला आले हाेते. महापालिका निवडणुकीची रणनिती आखण्याच्या अनुषंगाने अमित शहा यांनी हा दौरा केला हाेता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

हे सुद्धा वाचा

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा सर्वसामान्यांसाठी भन्नाट उपक्रम!

Yakub Memon : याकूब मेमन कोण होता ?

Yakub Memon : याकूब मेमन प्रकरणावरून कॉंग्रेसचा भाजपवर जबराट पलटवार !

अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त असतांना ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय अमित शहा यांना झेड प्ल्स सुरक्षा आहे. असे असतांना हा तरुण त्यांच्या जवळ पोहोचलाच कसा हा प्रश्न गंभीर आहे. त्याच्या पालकांची चौकशी केली असता त्याला या विषयी काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी