33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकर यांची पुन्हा दमदार एंट्री

प्रकाश आंबेडकर यांची पुन्हा दमदार एंट्री

टीम लय भारी

मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.  राज्यातील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे(Prakash Ambedkar’s strong entry again)

सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

फडणवीस शाळेत जात होते तेव्हा भाजपचे दोनच खासदार होते; मलिकांचा टोला

राज्यातील शाळांबाबत ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हे काही  वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत.महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांचे लवकरच जागावाटप करण्यात येईल. उद्यापासूनच प्रचाराला सुरुवात होणार असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जे करत आहे ते घटनाविरोधी आहे. वारंवार कोव्हिडच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलणे चुकीचं आहे. आणीबाणी जरी घोषित होणार असेल तरी निवडणूका पुढे ढकलता येत नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…

Dr. B.R. Ambedkar’s 65th Death Anniversary: 25 amazing facts about Dr. B. R. Ambedkar

आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत. तसेच, शिवसेनेसोबतही युती करायला तयार आहोत. मात्र, शिवसेना आमच्यासोबत येईल का हा प्रश्न आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना या सेक्युलर पक्षासोबत युती करण्याची तयारी असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत वंचित बहुजन आघाडीची युती होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत महत्त्वाची घोषणाही केली आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी