28 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रराणे-फडणवीस-दरेकर यांचा कोकण दौरा, पूरग्रस्त भागाची केली पाहणी, पुनर्वसनाची दिली हमी

राणे-फडणवीस-दरेकर यांचा कोकण दौरा, पूरग्रस्त भागाची केली पाहणी, पुनर्वसनाची दिली हमी

प्राची ओले :  टीम लय भारी

पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचा आज कोकण दौरा. (Rane, fadanvis and darekar to visit kokan)

पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी आज कोकण दौरा केला. पुरामुळे जनजीवन विस्कळित झालेल्या चिपळूण, महाड, खेडची आज त्यांनी पाहणी केली.(Chiplun, khed, mahad)

मुख्यमंत्र्यांनी चिपळूण येथील पूरपरिस्थितीची केली पाहणी

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादांचा दिलखुलास रुप; कार्यकर्त्याच्या इच्छेखातर चहाच्या टपरीचे केले उद्घाटन

Rane
राणे-फडणवीस-दरेकर यांचा कोकण दौरा

महाड मधल्या तळीये गावाला दिलेल्या भेटी नंतर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. हि घटना अतिशय दुर्दैवी आहे. बचाव कार्याचे काम गतीने सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून उद्ध्वस्त झालेल्या घरांचे पूर्णपणे पुनर्वसन होईल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्क्या घरांचे आयोजन केले जाईल. गावाला जेवढी जमेल तेवढी मदत केंद्र आणि राज्य सरकारकडून केली जाईल, फक्त गेलेले प्राण आम्ही परत करू शकत नाही

. पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफ चांगल्या प्रकारे काम करत आहे, त्यांना सहकार्य करावे. जिल्हाधकाऱ्यांन सोबत झालेल्या भेटीत, गावला संपूर्ण आधार देण्यात येईल. तात्काळ आणि कायमचं पुनर्वसन गावातच करुण दिलं जाईल असे त्यांनी म्हंटले. संपूर्ण पाहणी करुण, मी मा. मोदींना याचा सगळा आढावा देणार आहे. पक्की घरे आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणून एक कायमची एनडीआरएफ ची टीम कोकणात ठेवण्यात यावी अशी मागणी करेल.

तर, चिपळूण मुख्य बजापेठेला भेट दिल्यानंतर, बाजारपेठेची स्थिती अत्यंत वाईट आहे, व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असे त्यांनी म्हंटले. या नुकसानाची सरकारने भरपाई द्यायला हवी. जर वेळेतच मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने सतर्कतेचा इशारा दिला असता, तर एवढे नुकसान झालेच नसते. नागरिकांच्या जेवणाची सुध्दा व्यवस्था केली नव्हती.

मदत करण्याचे आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करणारच, या सगळ्याचा अहवाल मी मा. पंतप्रधानांना देणार आहे. या सगळया परिस्थितीला मुख्यमंत्री आणि राज्यसरकार जबाबदार आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टोले केले आहेत. त्यांचा पायगुण वाईट आहे, ते येताना कोरोना घेऊन आले. आणि आत्ता सुध्दा आलेलं हे संकट त्यांच्याच पायगुणांमुळे आले आहे. अश्या शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे झाले ट्रोल; या कारणामुळे नेटकऱ्यांनी घेतले फैलावर

Maharashtra Rains LIVE: CM Uddhav takes stock of flood-hit Chiplun; 150 NDRF teams deployed

तर, देवेंद्र फडणवीस यांनी तळीये गावातील आपत्तीग्रस्तांना ज्या प्रकारची मदत अपेक्षित आहे ती मिळेल असे आश्र्वासन दिले आहे. अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून पूर्णपणे काळजी घेण्यात येईल. तर, आमचे सहकारी प्रवीण दरेकर हे अत्यंत जागरूक प्रतिनिधी आहेत. प्रशासन आणि मदत कशी लवकर पोहचेल याचा त्यांनी प्रयत्न केला.
तर, चिपळूणच्या दौऱ्यावर त्यांनी देखिल राज्यसरकार वर टीका केली आहे. राज्यसरकारने निकषांबाहेर जाऊन कोकणला मदत द्यायला हवी अशी त्यांनी मागणी केली आहे.
आता पर्यंत दरडग्रस्त तळीये गावात मृतांची संख्या ही 44 वर पोहचली आहे. या घटनेला 4 दिवस होऊनही अजूनपर्यंत बाचव कार्य सुरू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी