31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा निर्बंध शिथिल होणार, सार्वजनिक कार्यक्रमांना २०० जणांची उपस्थिती

राज्यात पुन्हा निर्बंध शिथिल होणार, सार्वजनिक कार्यक्रमांना २०० जणांची उपस्थिती

टीम लय भारी
 मुंबई : मधल्या काही काळात राज्यात ओमायक्रॉन महामारीचा उद्रेक दिसून आला होता. त्यात दिवसेंदिवस ओमायक्रॅानचा प्रादुर्भाव झालेल्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. वाढती रूग्णसंख्या लक्षात घेत राज्य सरकारने मागील वर्षी २०२१ डिसेंबर महिन्यात(Restrictions will be relaxed state, public events people 200)

पुन्हा कोरोनाचे संकट लक्षात घेत कठोर नियमावली जाहीर केली होती. शिवाय सरकारने नववर्षाची सुरूवात होताच नागरिकांवर जमावबंदी देखील लागू केली.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Corona, omicron : कोरोनाचा आकडा 26 हजारांच्या पार, तर ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण

Omicron: चिंतेतभर; देशात पुन्हा एकदा लॉकडाउन?

मुंबई महापालिका Omicron ला रोखण्यासाठी सज्ज; महापौरांनी मुंबईकरांना केलं आवाहन,म्हणाल्या…

India opens up as Covid cases dip, curbs relaxed in THESE states | Check details

 मात्र राज्यातील कोरोना व ओमायक्रॅान महामारीची सध्यस्थिती  पुन्हा आटोक्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहेत. त्यामुळे कोरोनाची व ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याची दिसता राज्यातील निर्बंध पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला आहे .

१ तारखेला मंगळवारपासून राज्यातील सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सार्वजनिक व सांस्कृतिक कार्यक्रम, या बाबतीतले निर्णय शिथिल करण्यात आले आहेत. आता या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना २०० लोकांची उपस्थिती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने नागरिकांचे जनजीवन पुन्हा नियमीत पणे सुरू करण्याचे आयोजित केले आहे.

याशिवाय अंत्यसंस्कारासाठी कितीही लोकांची हजेरी लागू शकते . मात्र उपाहारगृह, नाटय़गृह, चित्रपटगृहे स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेने खुली राहणार आहेत. राज्यातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येतील घट कायम दिसून येता राज्य सरकारने राज्यातील निर्बंध पुन्हा शिथिल  करण्याचे आयोजिले आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी