महाराष्ट्रराजकीय

राज ठाकरे हे भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलत आहेत – रोहित पवार

रोहित पवार म्हणतात की, मराठी अस्मिता, मुंबईचा स्वाभिमान, युवकांचा रोजगार हे मराठी मनातील मुद्दे आहेत.

टीम लय भारी 

राज ठाकरे हे भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलत आहेत - रोहित पवार

मुंबई:  राज ठाकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणतात की, मराठी अस्मिता, मुंबईचा स्वाभिमान, युवकांचा रोजगार हे मराठी मनातील मुद्दे आहेत. Rohit Pawar criticize Raj Thakreray

याच मुद्द्यांना घेऊन कधीही फायदा तोट्याचा विचार न करता मराठी मनाची भूमिका प्रखरपणे मांडणारे राज ठाकरे साहेब आज भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलत आहेत याचं नक्कीच दुःख आहे.

असो!

काही कारणास्तव भूमिका या तात्पुरत्या बदलाव्या लागल्या असतीलही, पण मराठी मनातील अस्मितेची, स्नेहाची भावना मात्र कधीही बदलणार नाही, ही अपेक्षा आहे. महाराष्ट्राला दिल्लीपुढं झुकवण्याचे असंख्य प्रयत्न झाले व होत आहेत, परंतु स्वाभिमानी बाण्याचा महाराष्ट्र ना कधी झुकला.. ना कधी झुकणार.

‘तोडा-फोडा आणि राज्य करा’ या भाजपच्या ब्रिटिशकालीन रणनीतीला मराठी माणूस ओळखून असल्याने द्वेषमूलक विचारांच्या रणनीतीला महाराष्ट्राचं मराठी मन नक्कीच हद्दपार करेल, हा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

हे सुध्दा वाचा:

आमदार रोहित पवार रमले पुस्तकांमध्ये

वाटलं होतं चंद्रकांत पाटील उमेदवार असतील पण…; रोहित पवारांची कोल्हापुरात फटकेबाजी

पाकिस्तानातील ‘शरीफ’ आणि बदमाष!

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close