महाराष्ट्र

अभिनेत्री केतकी चितळे कणखर आहे :  सदाभाऊ खोत

मात्र माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते  सदाभाऊ खोत यांनी केतकीचं समर्थन केले आहे. अभिनेत्री केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल, न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली असं त्यांनी म्हटलं आहे.

टीम लय भारी

अभिनेत्री केतकी चितळे कणखर आहे :  सदाभाऊ खोत

उस्मानाबाद : तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक, अशी वादग्रस्त फेसबुक पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने केली आहे. त्यामुळे ती वादात सापडली आहे. केतकीचं विधान चूकीचं आहे अशी टीका अनेकांनी केली होती. मात्र माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी केतकीचं समर्थन केले आहे. अभिनेत्री केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल, न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली असं त्यांनी म्हटलं आहे. Sadabhau khot on actress ketaki chitale

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका होते. तेव्हा तुमची नैतिकता कुठे जाते असा ही सवाल त्यांनी केला आहे. म्हणजे तुम्ही केलं तर पाटलाच्या पोराने केलं आणि दुसऱ्यानं केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. प्रत्येकाला स्वाभिमान आहे.’

‘प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांवर अन्याय केलेला आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो आमचा लढा हा वाडा विरुद्ध गावगाडा आहे. आम्हाला वाडे पाडायचे आहेत.’ अशी टीका देखील सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी यावेळी केली आहे. सदाभाऊ खोत हे आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे आले होते दरम्यान त्यांनी केतकीच्या समर्थन केले आहे.

हे सुद्धा वाचा: 

केवळ आर्थिक राजधानी नाही; महाराष्ट्र ही संत, वीर योद्धे व समाज सुधारकांची भूमी : भगत सिंह कोश्यारी

As Heat Wave Roasts North India, A Look at IMD Warning, Saving Yourself from Heatstroke & Other Survival Tips

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close