30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeटेक्नॉलॉजीSamsung ने भारतात लॉंच केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फिचर्स...

Samsung ने भारतात लॉंच केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फिचर्स !

टीम लय भारी

नवी दिल्ली: Samsung Galaxy A03 Core भारतीय बाजारात लॉंच केला आहे. या Budget Smartphone च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर Samsung Galaxy A03 Core हा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये HD प्लस डिस्प्लेसह 5000 mAh ची मजबूत बॅटरी आहे. Galaxy A03 Core मध्‍ये दिलेल्‍या फीचर्स आणि किंमतीबद्दल सविस्तर जाणून घेऊया…( Samsung launches cheapest price smartphone in India)

Samsung Galaxy A03 Core Display | सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर डिस्प्ले

Samsung Galaxy A03 Core मध्ये HD+ रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा Infinity V डिस्प्ले आहे. फोनमध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर, 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज मिळेल, जे 1 TB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन अँड्रॉइड गो एडिशन सह सादर करण्यात आला आहे.

Vivo चा शानदार स्मार्टफोन बाजारात, 64MP बॅक, 50MP फ्रंट कॅमेरासह जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Jio Phone Next : रिलायन्स डिजिटलवर सेल सुरू; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

Samsung Galaxy A03 Core Software | सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर सॉफ्टवेअर

सॉफ्टवेअर: Samsung Galaxy A03 Core स्मार्टफोन Android 11 (Go Edition) वर काम करतो.

Samsung Galaxy A03 Core Processor | सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर प्रोसेसर

वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह Unisock SC9836A ऑक्टा-कोर प्रोसेसर, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 1TB पर्यंत वाढवणे शक्य आहे.

Samsung Galaxy A03 Core Camera | सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर कॅमेरा

Galaxy A03 Core मध्ये सिंगल रियर आणि सिंगल फ्रंट कॅमेरा आहे. Galaxy A03 Core मध्ये f/2.0 च्या अपर्चरसह 8-मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा आहे. समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. मागील कॅमेरासोबत फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

फोन बिघडल्यावर दुरुस्तीसाठी कंपनीचा सर्व्हिस मॅनेजर येणार घरी, सेवा पूर्णपणे मोफत

UP free smartphones, tablets yojana distribution date: Know when and how to register

Samsung Galaxy A03 Core Battery | सॅमसंग गॅलेक्सी ए03 कोर बॅटरी

सॅमसंगच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनसोबत फास्ट चार्जिंग देण्यात आलेली नाही. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 4G LTE, सिंगल बँड Wi-Fi 802.11 b/g/n, Wi-Fi डायरेक्ट, ब्लूटूथ v4.2, 3.5mm हेडफोन जॅक, GPS, चार्जिंग पोर्ट आणि ग्लोनास आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी