28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजफोन बिघडल्यावर दुरुस्तीसाठी कंपनीचा सर्व्हिस मॅनेजर येणार घरी, सेवा पूर्णपणे मोफत

फोन बिघडल्यावर दुरुस्तीसाठी कंपनीचा सर्व्हिस मॅनेजर येणार घरी, सेवा पूर्णपणे मोफत

टीम लय भारी

LAVA Agni 5G  : भारतीय स्मार्टफोन ब्रँड, LAVA इंटरनॅशनल लिमिटेडने त्यांच्या आगामी Agni 5G स्मार्टफोनच्या खरेदीदारांसाठी एक नवीन ग्राहक सेवा उपक्रम जाहीर केला आहे(Lava launches new phone)

या सेवेला LAVA Agni Mitra असे नाव देण्यात आले असून अशी सेवा देणारी LAVA ही भारतातील पहिली कंपनी ठरली आहे. (LAVA Agni Mitra : Lava announces customer service initiative for Agni 5G smartphone users in India)

सलमान आणि आयुषच्या ‘अंतिम’ची जादू, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

क्रडिट कार्ड वापरत असला तर ही बातमी वाचाच, कारण…

नवीन उपक्रमाचा एक भाग म्हणून, लावाने Agni 5G स्मार्टफोन युजर्ससाठी डेडिकेटेड सर्व्हिस मॅनेजर देण्याचे वचन दिले आहे. हा मॅनेजर युजर्सना फोनमध्ये काही समस्या आल्यास मदत करेल. याशिवाय, कंपनी अग्नी युजर्सना घरोघरी सेवा देण्याचे वचन देत आहे.

या उपक्रमानुसार, लावा सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह रजिस्टर्ड कस्टमर अॅड्रेसवरुन फोन कलेक्ट करतो आणि तो दुरुस्त करुन पुन्हा त्याच पत्त्यावर आणून परत देतो.

शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजीवर जोर – वर्षा गायकवाड

Lava Agni 5G: This phone should keep you happy for a long time

नवीन ग्राहक सेवा विनामूल्य उपलब्ध असेल

विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया मोफत दिली जाणार आहे. याशिवाय, जर युजर्सना देशभरातील कोणत्याही LAVA सेवा केंद्राला भेट द्यायची असेल, तर Agni 5G स्मार्टफोन ग्राहकांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल.

Agni 5G स्मार्टफोन ग्राहकांच्या सुविधेसाठी LAVA कस्टमर केअर कॉलसाठी झिरो-वेट टाईम असेल असे कंपनीने म्हटले आहे. या फोनमधील सर्वोत्तम फीचर म्हणजे सोल्यूशननंतर, युजर्स वैयक्तिक प्रतिक्रिया देखील देऊ शकतील.

कसा आहे Lava Agni 5G?

Lava ने या महिन्याच्या सुरुवातीला 5G कनेक्टिव्हिटीसह Lava Agni 5G लाँच केला आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये लेटेस्ट 5G टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये MediaTek डायमेंशन प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 64 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

Lava Agni 5G ची किंमत 19,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे, परंतु कंपनीकडून या फोनवर विशेष सवलत दिली जाईल, त्यानंतर या फोनची किंमत 17,999 रुपये असेल.

हा स्मार्टफोन लावाच्या अधिकृत वेबसाइट Lava वरून प्री-बुक करता येईल. मात्र, हा स्मार्टफोन कधीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन फेयरी ब्लू कलरमध्ये येतो.

Lava Agni 5G चे स्पेसिफिकेशन्स

Lava Agni 5G मध्ये 2.5D कर्व्ह ग्लाससह 6.78-इंच फुल HD+ IPS LCD डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 1080×2460 रिझोल्युशनसह येतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. कंपनीने या मोबाईलमध्ये MediaTek Dimension 810 चिपसेट दिला आहे.

तसेच, यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे. हा फोन Android 11 आऊट ऑफ द बॉक्स वर काम करतो.

Lava Agni 5G चा कॅमेरा सेटअप

Lava Agni 5G च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, या फोनच्या बॅक पॅनल वर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा आहे. यात 5 मेगापिक्सल्सचा सेकेंडरी कॅमेरा आहे, जी एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. यासोबतच इतर दोन 2-2 मेगापिक्सलचे कॅमेरे देण्यात आले आहेत.

तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो स्क्रीन फ्लॅश फीचर्ससह येतो. यामुळे कमी प्रकाशातही चांगले फोटो क्लिक करण्यात मदत होईल.

Lava Agni 5G ची बॅटरी

Lava Agni 5G च्या बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000 mAh Li-Polymer बॅटरी आहे, जी 30W फास्ट चार्जिंग क्षमतेसह येते. तसेच या स्मार्टफोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. यात OTG सपोर्ट, ब्लूटूथ v 5.1 आणि टाइप सी यूएसबी कनेक्टिव्हिटी असे काही फीचर्स देण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी