36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeक्राईमसांगली हत्याकांडाचा आज होणार संपुर्ण उलगडा, पोलिस करणार पर्दाफाश

सांगली हत्याकांडाचा आज होणार संपुर्ण उलगडा, पोलिस करणार पर्दाफाश

टीन लय भारी

सांगली : सांगली येथील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील वनमोरे यांच्या एकाच घरातील नऊ जणांच्या हत्येने संपुर्ण राज्य हादरले. या हत्येमागील खरे कारण आता समोर आले असून त्याबाबत खुलासा करण्यासाठी आज (दि. 02 जून) संध्याकाळी पाच वाजता पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे एकत्रित हत्याकांडामागील सत्य आणि त्याबाबत असणाऱ्या अनेक गोष्टींचा अखेर उलगडा होणार आहे.

म्हैसाळ येथे नऊ जण एकत्रितपणे मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली. सुरूवातीला आत्महत्या केली असावी असा संशय बांधण्यात येत होता. दरम्यान, दोन मृतदेहांच्या खिशात एकाच हस्ताक्षरातील चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत पैसे घेतलेल्यांची नावे आणि त्यात तब्बल 25 जणांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याची नावे आढळून आली त्यामुळे या नऊ जणांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 18 जणांना अटक केली.

दरम्यान गुप्तधनाचे आमिष दाकवून मोठी रक्कम उकळणारा या हत्याकाडांतील मुख्य आरोपी मांत्रिक अब्बास मोहंमद अली त्या दिवशी वनमोरे कुटुंबियांच्या घरी संपुर्ण दिवस होता. त्यामुळे या प्रकरणी नेमकं काय घडलं असावं याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मांत्रिकाच्या घराची झडती घेतली, त्यावेळी त्यांना मंत्र – तंत्राचे साहित्य हाती लागले.

या संपुर्ण प्रकरणात वेगवेगळे माहिती समोर आल्याने या प्रकरणाचे आणखी गुढ वाढले, परंतु गेल्या 12 दिवसांपासून याप्रकरणी कसून तपास केल्यानंतर अखेर त्यांना खरे कारण शोधण्यास यश आले आहे. संध्याकाळी पाच वाजता पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया पत्रकार परिषद घेणार असून अखेर हा संपुर्ण हत्याकांड कोणी आणि कशासाठी घडवून आणला हे सारेच स्पष्ट होणार आहे.

हे सुद्धा वाचा :

राजन साळवींच्या उमेदवारीने बंडखोरांची ‘लाज’ चव्हाट्यावर येणार !

लोकसेवा आयोगाच्या उत्तर तालिकांवरील हरकतीसाठी द्यावे लागणार शुल्क

VIDEO : यशोमती ठाकूर झाल्या भावूक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी