31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयसुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीसंदर्भात शरद पवारांचं मोठं भाकीत

सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीसंदर्भात शरद पवारांचं मोठं भाकीत

टीम लय भारी

पुणे – महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. विविध स्तरांतून सरकारच्या या निर्णयाचा विरोध सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर भाष्य केले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध हा चिंतेचा विषय नसून निर्णय बदलला तर वाईट वाटण्याचे कारण नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले.(Sharad Pawar’s big prediction wine sales supermarkets)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावर मात केल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावर भाष्य केले.  राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नसल्याचे शरद पवारांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल, नवाब मलिकांचे धक्कादायक वक्तव्य

रुपाली पाटील कडाडल्या, “भाडखाऊ भाईजान” ला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे

“मी फार छोटा माणूस…” असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर लगावला टोला

Shiv Sena calls Union budget as ‘virtual’, Sharad Pawar says a disappointing one

सरकारच्या निर्णयाला जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप तुलनेने अत्यंत कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये १८ वाईनरी आहेत. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल, तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला तरी वाईट वाटायचे कारण नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबतही आपले निरीक्षण सांगितले. दिल्लीच्या सीमेवर वर्षभर शेतकरी आंदोलनाला बसले होते. आंदोलनामुळे केंद्र सरकारने कायदे मागे घेतले. पण त्यांच्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. भाजप सरकारला याची किंमत मोजावी लागणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी