31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयनितेश राणेंचा मोठा निर्णय, न्यायालयासमोर शरण जाणार

नितेश राणेंचा मोठा निर्णय, न्यायालयासमोर शरण जाणार

टीम लय भारी

सिंधुदुर्ग:- भाजप आमदार नितेश राणे कोर्टात शरण येणार असल्याची माहिती नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे. तर नितेश राणे शरण आल्यास त्यांची कोठडी मागणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.( Nitesh Rane’s big decision, will surrender)

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे.

नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली, पोलीस आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक

नितेश राणेंच्या स्वीय सहाय्यकाला चार दिवसांची पोलिस कोठडी

नितेश राणेंना जामीन नाकारल्यानंतर मिलिंद नार्वेकरांचे ट्वीट, म्हणाले…

BJP Announces Lucknow Choices: Aparna Yadav, Rita Bahuguna’s Son Left Out

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र नितेश राणे यांनी हायकोर्टातील अर्ज मागे घेतला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीन मानेशिंदे यांनी दिली आहे.

नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचं सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यांना तपासाला सामोरं जाण्याची इच्छा आहे”. हायकोर्टानेदेखील अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी