31 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeसिनेमापती राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कामात अडचणी

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कामात अडचणी

टीम लयभारी

मुंबई :- पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याच्या कारणावरून अटक केल्यानंतर आता त्याचा परिणाम शिल्पा शेट्टीच्या कामावर होताना दिसतोय. राज कुंद्रा आणि आरोपी रियान थार्प या दोघांना न्यायालयाने 23 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र पतीच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे (Actress Shilpa Shetty troubles seem to be on the rise after her husband arrest).

सध्या शिल्पा सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या सुपर डान्सर सीझन-४ या रिॲलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. या रिॲलिटी शोचे शूटिंग हे सोमवारी किंवा मंगळवारी करण्यात येते. त्यामुळेच मंगळवारी 20 जुलैला मुंबईत या शोच्या एपिसोड्सचे शूटिंग होणार होते. मुख्य म्हणजे या भागासाठी बॉलिवुड अभिनेत्री करिश्मा कपूर ही प्रमुख पाहुणी म्हणून येणार होती. परंतु, पतीच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टी शूटिंगवर जाऊ शकली नाही म्हणून उर्वरित परीक्षकांच्या उपस्थित हे शूटिंग पार पडले.

‘पेगॅसस’ भानगडीमुळे ‘ईव्हीएम’ घोटाळ्याला फुटली वाचा

भारतीय गोलंदाजांचा फलंदाजीत धडाका

सूत्रांच्या माहितीनुसार शिल्पा शेट्टी जर सुपर डान्सर सीझन-४ च्या शूटिंगसाठी आली नाही तर तिची जागा अभिनेत्री करिश्मा कपूरला मिळू शकते. मात्र मेकिंग टीम शिल्पाच्या शो मध्ये परतण्याची वाट पाहात असून जर शिल्पा शेट्टी नाही आली तर मेकर्स करिश्मा कपूरशी संपर्क साधणार आहेत (If Shilpa Shetty does not come, the makers will contact Karisma Kapoor).

Shilpa Shetty troubles the rise after her husband arrest
शिल्पा शेट्टी

अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर “बीग बी शो बिग हार्ट” म्हणत मनसेची पोस्टरबाजी

When Shilpa Shetty opened up about her first meeting with husband Raj Kundra, said he tried to woo her with a luxury bag

सुपर डान्सर सीझन-4 हा डान्सचा रिॲलिटी शो सोनी टीव्हीवर दर शनिवारी आणि रविवारी प्रदर्शित होतो. या शो मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, नृत्यदिग्दर्शक गीता कपूर आणि दिग्दर्शक अनुराग बासू हे जजची भूमिका साकारत आहेत.

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी तिच्या जुहू येथील किनारा बंगल्यावर बहीण शमिता आणि मुलांसोबत राहत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी