31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदेसेनेची ताकद वाढली! परभणीचे खासदार संजय जाधव शिवसेनेतून 'आऊट'

शिंदेसेनेची ताकद वाढली! परभणीचे खासदार संजय जाधव शिवसेनेतून ‘आऊट’

टीम लय भारी

परभणी : राज्यात शिवसेना वि. शिवसेना संघर्ष दिवसेंदिवस आणखीच चिघळत चालला आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर आता खासदार सुद्धा शिवसेनेला डच्चू देत हळूच शिंदेसेनेकडे आपला मोर्चा वळवत आहेत. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी सुद्धा शिवसेनेला धक्का देत शिंदे गटात सामील झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात शासकीय महापुजेला जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत हजेरी लावून आपले समर्थन दर्शवले आहे.

राजकारणातला अभूतपूर्व बंड महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांमध्ये अनुभवला. यामध्ये शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेविरूद्धच बंड पुकारल्याने शिवसेनेला अक्षरशः मेटाकुटीस आणले. अनेक वर्षांपासून शिवसेनेचे बोट धरून राज्याचा गाडा हाकणारे आमदार सत्तालालसेपोटी शिवसेनेची वाट सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छत्रछायेखाली सध्या धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेचे खासदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परभणी येथील शिवसेना खासदार संजय जाधव त्याआधीच शिंदेगटात सामील झाले असून त्यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त पार पडलेल्या शासकीय महापुजेस हजेरी लावली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार जाधव यांचा सत्कार केला. खासदार सुद्धा शिंदे गटात सामील होऊ लागल्याने बंडखोरीचे सावट आता आणखी गडद होत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, खासदार भावना गवळी आणि आता खासदार संजय जाधव देखील शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची जयंत पाटील यांनी केली विनंती

संजय राऊतांचा बंडखोरांना टोला, ५० कोटी पचणार नाहीत

एकनाथ शिंदेंचा विचित्र निर्णय, सधन वर्गाला खुष करण्यासाठी वंचितांना चिरडले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी