38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयईडी कार्यालयाला पुढील अडीच वर्षे सुट्टी? हर्षल प्रधान यांचा यंत्रणांना कडवट सवाल

ईडी कार्यालयाला पुढील अडीच वर्षे सुट्टी? हर्षल प्रधान यांचा यंत्रणांना कडवट सवाल

टीम लय भारी

मुंबई : ‘भाजपच्या विरोधात जाणाऱ्यांवर ईडी कारवाई’ असे समीकरण गेल्या दोन वर्षांपासून आणखीच ठळक होऊ लागले आहे. राज्यातील राजकीय बंड त्यामुळेच झाला का अशा उलट – सूलट चर्चा देखील सुरू आहेत. परंतु अशाप्रकारे राजकीय सूडबुद्धीने केलेल्या कारवाई न्याय्य आहे का असा सवाल शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक आमदार, खासदारांमध्ये  ईडी कारवाईची दहशत पसरवली गेली, यंत्रणांची टांगती तलवार सतत दिसायला लागली, त्यावर रामबाण उपाय म्हणून शिवसेना आमदारांनी बंड पुकारले आणि भाजपच्या गोटात सामील झाले, परिणामी ईडीकारवाईचा भोंगा शांत झाला आणि सगळीकडे आलबेल दिसू लागले.

हाच मुद्दा उपस्थित करत केवळ राजकीय हेतू सिद्धीस नेण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर कसा केला जातोय का याकडे हर्षल प्रधान यांनी लक्ष वेधले आहे.

यावर बोलताना हर्षल प्रधान म्हणाले, गेल्या दोन वर्षांत भाजपने राजकीयदृष्ट्या ज्यांना – ज्यांना टार्गेट केले होते, त्यानंतर ईडीची कारवाई झाली. केंद्र सरकारकडून प्रथमच अशा पद्धतीने राज्यात ईडीचा गैरवापर करण्याचा प्रकार घडला. आपल्या अखत्यारीत असलेल्या यंत्रणांच्या माध्यमातून राजकीय वैमनस्य काढण्याचा चुकीचा पायंडा भाजपने पाडला आहे.

ईडी कारवाईविषयी बोलताना प्रधान म्हणाले, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ज्यांची – ज्यांची नावे घेतली त्यांच्यामागे ईडीने चौकशीचे शुक्लकाष्ट लावले, अगदी ठरवून,आदेश दिल्याप्रमाणे चौकशी करण्यात आली. आता ज्यांची ज्यांची नावे घेतली गेली ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाजपमध्ये गेले. आता त्यांच्यावर कारवाई होणार का हा खरा प्रश्न आहे, असे म्हणून प्रधान यांनी भाजपला टीका केली आहे.

भाजपच्या विरोधात असाल तर कारवाई आणि भाजपसोबत असाल तर कारवाई नाही असेच होणार असेल तर ते न्याय्य आहे का याचा विचार जनता सुद्धा करत आहे. भाजपमध्ये गेलेल्यांवर यापुढेही कारवाई झाली तरच ईडीने निष्पक्षपणे कारवाई केली असे म्हणता येईल. पण तसे होणार आहे का नाहीतर हे ईडीचे सरकार आहे असे जनता बोलत आहे, असे प्रधान यांनी भाजपला निक्षून सांगितले आहे.

दरम्यान, नव्या सत्ताधाऱ्यांना मिश्किल टोला लगावत हर्षल प्रधान म्हणाले, ईडी म्हणजे ‘एकनाथ’ आणि ‘देवेंद्र’ अशा मीम्स व्हायरल झाल्या आहेत त्यामुळे आता राज्यातही भाजप सत्तेवर आल्याने ईडी कार्यालयाला पुढील अडीच वर्षे सुट्टीच मिळेल असे दिसतेय.

हे सुद्धा वाचा…

शिंदेसेनेची ताकद वाढली! परभणीचे खासदार संजय जाधव शिवसेनेतून ‘आऊट’

सातारा पोलीस अधिक्षकांचे ‘मायणी’ला झुकते माप, ‘छावणी’वर मात्र अन्याय, शिवसेनेचा आरोप

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची जयंत पाटील यांनी केली विनंती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी