32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरक्रीडाIND vs NED : भारताची सेमी फायनल फिक्स! वर्ल्डकप मध्ये सलग दुसरा...

IND vs NED : भारताची सेमी फायनल फिक्स! वर्ल्डकप मध्ये सलग दुसरा विजय

भारताचा दुसरा सामना गुरुवारी (27 ऑक्टोबर) नेदरलँड्स विरुद्ध आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय संघाने तब्बल 56 धावांनी विजय मिळवत आपल्या गटात पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे.

सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेला टी20 विश्वचषक रंगात असल्याचे पाहायला मिळत आहे. या वर्ल्डकप मधील भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबर रोजी खेळवला गेला. यावेळी अटी-तटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात करतक वर्ल्डकपमधील आपली दावेदारी सिद्ध केली. त्यानंतर भारताचा दुसरा सामना गुरुवारी (27 ऑक्टोबर) नेदरलँड्स विरुद्ध आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय संघाने तब्बल 56 धावांनी विजय मिळवत आपल्या गटात पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे. शिवाय या मोठ्या विजयाने भारतीय संघाचा नेट रन रेट चांगल्या स्थितीत असल्याने जवळपास सेमी फायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे.

गुरुवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मैदानाची स्थिती आणि वर्ल्डपमध्ये होणारे आगामी सामने लक्षात घेता हा योग्य निर्णय असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या के एल राहुलला मोठी खेळी करण्यास पुन्हा एकदा अपयश आले. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. यावेळी रोहितने 39 चेंडूत 53 धावा केल्या. याशिवाय विराट कोहलीने सर्वोत्कृष्ट खेळी करत 44 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. यानंतर फलंगदाजी सुर्यकुमार यादवने धडाकोबाज खेळी करत अवघ्या 25 चेंडूत 51 धावा केल्या. या तीन अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताने पहिली फलंदाजी करताना 20 षटकांत 179 धावा केल्या.

हे सुद्धा वाचा

Arvind Kejriwal vs BJP : नोटांवरील फोटो बदलण्याच्या केजरीवालांच्या मागणीला भाजपचे सडेतोड उत्तर

BCCI : आता महिला खेळाडूंनाही मिळणार विराट कोहली इतकाच पगार! जय शहा यांची घोषणा

Aaditya Thackeray : उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे बळीराजाच्या भेटीला

भारताने दिलेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. यावेळी भुवनेश्वर कुमारने नेदरलँड्सला पहिला झटका दिला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत नेदलँड्स संघाला लक्ष्यापासून दूर ठेवले. नेदरलँड्स संघाला या मान्यात 9 विकेट्स गमावत केवळ 123 धावा करता आल्या. यावेळी भारतासाठी अक्षर पटेलने 4 षटकांत केवळ 18 धावा देत 2 बळी घेतले. शिवाय रविचंद्रन अश्विनने 4 षटकांत 21 धावा देत 2 बळी घेतले. शिवाय वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास भुवनेश्वर कुमार अन् अर्शदिप सिंगने प्रत्येकी 2 बळी घेतले. मोहम्मद शमाने देखील 1 विकेट घेत भारताच्या विजयात आपले योगदान दिले.

दरम्यान, भारताचा वर्ल्डकपमधील पुढील सामना रविवारी (30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भआरतीय संघाची सेमी फायनल मधील सीट एकदम पक्की होईल. त्यामुळे या सामन्यांत देखील भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी चांगली मेहनत करताना दिसणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!