31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeक्रीडाIPL 2024: लखनऊच्या टीमला बसला मोठा धक्का, मार्क वुड नंतर डेव्हिड विली सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर

IPL 2024: लखनऊच्या टीमला बसला मोठा धक्का, मार्क वुड नंतर डेव्हिड विली सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर

IPL 2024 च्या एका दिवसांआधी केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्सला दुसरा मोठा धक्का बसला आहे. मार्क वुडनंतर आता डेव्हिड विली देखील आयपीएलचे पहिले काही सामने खेळणार नाही. (IPL 2024 KL Rahul team suffered a major blow, David Willey out of the opening match) डेव्हिड विलीने ILT20 नंतर पाकिस्तान सुपर लीगमध्ये भाग घेतला होता.  तो 18 मार्चला  मुलतान सुलतान साठी पीएसएल फायनल खेळला होता. लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितले की, वैयक्तिक कारणांमुळे डेव्हिड विली  पहिले काही सामने खेळणार नाही.

IPL 2024 च्या एका दिवसांआधी केएल राहुलच्या (KL Rahul) लखनऊ सुपर जायंट्सला दुसरा मोठा धक्का बसला आहे. मार्क वुडनंतर आता डेव्हिड विली देखील आयपीएलचे पहिले काही सामने खेळणार नाही. (IPL 2024 Lucknow Super Giants suffered a major blow, David Willey out of the opening match) डेव्हिड विलीने ILT20 नंतर पाकिस्तान सुपर लीगमध्ये भाग घेतला होता.  तो 18 मार्चला  मुलतान सुलतान साठी पीएसएल फायनल खेळला होता. लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितले की, वैयक्तिक कारणांमुळे डेव्हिड विली  पहिले काही सामने खेळणार नाही. (IPL 2024 Lucknow Super Giants suffered a major blow, David Willey out of the opening match)

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी, इंग्लंडचे खेळाडू एकामागून एक बाहेर पडत आहेत. डेव्हिड विलीपूर्वी चार इंग्लिश खेळाडू आयपीएल 2024 मधून बाहेर पडले आहेत. यामध्ये मार्क वुड (लखनऊ सुपर जायंट्स), हॅरी ब्रूक (दिल्ली कॅपिटल्स), जेसन रॉय आणि गस ऍटकिन्सन (कोलकाता नाइट रायडर्स) यांचा समावेश आहे. लखनऊच्या टीमसाठी हा दुसरा मोठा धक्का आहे.

IPL 2024: MS धोनीचा राजीनामा, रुतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्जचा नवा कर्णधार

लखनऊ सुपर जायंट्सने डेव्हिड विलीला IPL 2024 च्या मिनी लिलावात 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले. विली दोन महिन्यांपासून सतत टी-20लीग खेळत आहे. यापूर्वी ILT20 आणि अलीकडे PSL मध्ये मुलतान सुलतान कडून खेळला. मीडियारिपोर्टनुसार, लखनऊ सुपर जायंट्स डेव्हिड विलीची जागेवर दुसऱ्या खेळाडूला घेणार नाही , कारण तो कधीही संघात सामील होऊ शकतो.

IPL 2024 चे सामने केव्हा, कुठे आणि कसे फ्रीमध्ये पाहू शकाल, जाणून घ्या लाइव्ह स्ट्रीमिंगचे संपूर्ण तपशील

जस्टिन लँगर पुढे म्हणाले की, मार्क वूडनंतर आता वेळीदेखील पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, ज्यामुळे आमच्याकडे अनुभवाची कमतरता असेल हे स्पष्ट होते. मात्र, गेल्या काही दिवसांत मी पाहिलं आहे की, आपल्याकडे खूप प्रतिभा आहे. काही खेळाडूंना दुखापत झाली आहे, मात्र आता सर्वजण ठीक दिसत आहेत.

रोहित शर्माने केला मोठा खुलासा, सरफराज खानबद्दल म्हटलं ‘असं’ काही

IPL 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक 

1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8.00 वाजता
2. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वाजता
3. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30 वाजता
4. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता
5. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
6. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स, 25 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
7. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, 7.30 वाजता
8. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, 7.30 वाजता
9. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, 7.30 वाजता
10. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 29 मार्च, बेंगळुरू, 7.30 वाजता
11. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 30 मार्च, लखनौ, 7.30 वाजता
12. गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, दुपारी 3.30 वाजता
13. दिल्ली सुपर कॅपिटल्स वि चेन्नई किंग्स, 31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
14. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
15. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बेंगळुरू, 7.30 वाजता
16. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रिडर्स 3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
17. गुजरात टायटन्स विरुद्ध  पंजाब किंग्स, 4 एप्रिल, अहमदाबाद, 7.30 वाजता
18. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, 7.30 वाजता
19. राजस्थान रॉयल्स विरुद्ध  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 6 एप्रिल, जयपूर, 7.30 वाजता
20. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
21. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30 वाजता

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी