30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाIPL 2024: 'पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळणार', इंग्लंडच्या 'या' माजी कर्णधाराचा मोठा...

IPL 2024: ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळणार’, इंग्लंडच्या ‘या’ माजी कर्णधाराचा मोठा दावा

आयपीएल 2024 ची धूम सर्वीकडे आहे. यंदाच्या हंगामात सर्व संघांनी त्यांचे जवळपास निम्मे सामने खेळले आहेत. पुढच्या हंगामासाठी मेगा लिलाव होणार आहे, पण त्याआधीच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन  ने मोठा दावा केला आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुढील वर्षापासून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसू शकतो, असा विश्वास वॉनला आहे. ऋतुराज  गायकवाड कदाचित सीएसकेचे कर्णधार फक्त एका हंगामासाठीच असेल असेही त्याने सांगितले. (ipl 2024 michael vaughn says rohit sharma may played for csk next year)

आयपीएल 2024 ची धूम सर्वीकडे आहे. यंदाच्या हंगामात सर्व संघांनी त्यांचे जवळपास निम्मे सामने खेळले आहेत. पुढच्या हंगामासाठी मेगा लिलाव होणार आहे, पण त्याआधीच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन  ने मोठा दावा केला आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुढील वर्षापासून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसू शकतो, असा विश्वास वॉनला आहे. ऋतुराज  गायकवाड कदाचित सीएसकेचे कर्णधार फक्त एका हंगामासाठीच असेल असेही त्याने सांगितले. (ipl 2024 michael vaughn says rohit sharma may played for csk next year)

T20 WC 2024 मध्ये विराट आणि केएल राहुल शिवाय खेळणार टीम इंडिया! माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान

मायकेल वॉनचे म्हणणे आहे की, धोनीच्या जागी रोहित शर्मा योग्य पर्याय असू शकतो धोनीच्या आयपीएल कारकिर्दीबाबत अनेक चर्चा सुरू असताना वॉनची ही प्रतिक्रिया आली आहे. धोनीचा हा शेवटचा आयपीएलचा हंगाम असून यानंतर तो या स्पर्धेला अलविदा करेल, असे मानले जात आहे. तुम्हाला सांगते की, आयपीएल 2024 हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले होते आणि त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडने संघाची कमान सांभाळली होती. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सीएसकेची या हंगामात कामगिरी चांगली राहिली असून संघाने आतापर्यंत पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत. (ipl 2024 michael vaughn says rohit sharma may played for csk next year)

IPL 2024: रोहित शर्माने केला मोठा खुलासा, सांगितले कधी घेणार संन्यास

वॉन ने पॉडकास्ट मध्येसां गितले, मला वाटते की रोहित चेन्नईच्या संघात सामील होईल आणि धोनीची जागा घेईल. त्याच्या जागी यंदा ऋतुराज भूमिका साकारत आहे. कदाचित पुढच्या वर्षी रोहित हे करताना दिसेल. मी त्याला चेन्नईत पाहतो. तो चेन्नईचा कर्णधार बनून मुंबईत आला तर त्याला सुद्धा ट्रोल केले जाईल का? (ipl 2024 michael vaughn says rohit sharma may played for csk next year)

तुम्हाला सांगते की, यंदाच्या हंगामात रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला मुंबई इंडिअन्सचा कर्णधार बनविण्यात आले आहे. हार्दिक मुंबईसाठी बराच काळ खेळला आहे, परंतु तो 2022 च्या हंगामासाठी गुजरात टायटन्सशी जुडला होता आणि त्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातला ट्रॉफी जिंकून दिली. मात्र, या हंगामासाठी गेल्या वर्षी झालेल्या खेळाडूंच्या लिलावापूर्वीच मुंबईने हार्दिकचा समावेश करून रोहितच्या जागी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवले होते. मुंबईच्या या निर्णयाला खूप विरोध झाला कारण रोहितच्या चाहत्यांनी रोहितच्या ऐवजी हार्दिककडे कर्णधारपद सोपवल्याने रोष व्यक्त केला. (ipl 2024 michael vaughn says rohit sharma may played for csk next year)

विराट कोहलीच्या विनंतीने बदलले वानखेडे स्टेडियमचे वातावरण, चाहत्यांनी केला हार्दिकच्या नावाचा जल्लोष

वॉन म्हणाला की, रोहितने किमान या मोसमापर्यंत मुंबईचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा होती, पण हार्दिकला ट्रोल करणे  योग्य नाही. वॉन म्हणाला, हार्दिक कठीण काळातून जात असून यात त्याची चूक नाही. त्याला पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये बोलावण्यात आले. याला कोण नाही म्हणेल? हार्दिकला प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूला आवडेल असे टास्क देण्यात आले होते. रोहितवर माझे वैयक्तिक प्रेम होते. हार्दिकचे मुंबईत परतणे त्याच्यासाठी आधीच तणावपूर्ण होते. रोहितला कर्णधारपदी ठेवणं आणि पुढच्या वर्षी हार्दिकला कर्णधार करणं हा योग्य निर्णय असायचा. पण ट्रोलिंग समजू शकले नाही. गुजरातमध्ये जेव्हा त्याची बदनामी झाली तेव्हा मी तिथे होतो, पण त्यानंतर तो हैद्राबादला गेला आणि नंतर वानखेडेला आला, तिथे मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिकला ट्रोल केले आहे.  मला ते अजिबात समजले नाही. टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी हार्दिकची गरज भासणार आहे, हे भारतीय क्रिकेट चाहत्यांना समजले पाहिजे. हार्दिकच्या उपस्थितीमुळे भारत या जागतिक स्पर्धेत विजयाचा दावेदार असेल. (ipl 2024 michael vaughn says rohit sharma may played for csk next year)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी