29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्रीडाODI IND vs AUS : भारताच्या पुनरागमनात पावसाचे विघ्न! वाचा काय सांगतोय...

ODI IND vs AUS : भारताच्या पुनरागमनात पावसाचे विघ्न! वाचा काय सांगतोय हवामानाचा अंदाज

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघातील त्रृटी जगासमोर उघड झाल्या. आता या कमतरतेवर मात करत भारतीय संघ दुसऱ्या टी20 सामन्यासाठी उत्सुक आहे. मात्र, या सामन्यात पाऊस विघ्न घालेल अशी भिती वर्तवली जात आहे.

सध्या ऑस्ट्रेलिया संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. आशिया चषकात टीम इंडियाच्या हाती निराशा आल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. आगामी टी20 विश्वचषक लक्षात घेता भारतासाठी दोन्ही मालिका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. विशेष म्हणजे सध्या आयसीसी टी20 क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ गेल्या टी20 विश्वचषकाचा विजयी संघ आहे तर दक्षिण आफ्रिका मोठ्या काळापासून अपराजित संघ आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला विश्वचषकाची तयारी चांगल्या पद्धतीत करता येईल असे भाकित ही मालिका सुरू होण्यापूर्वी वर्तवले जात होते. मात्र, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघातील त्रृटी जगासमोर उघड झाल्या. आता या कमतरतेवर मात करत भारतीय संघ दुसऱ्या टी20 सामन्यासाठी उत्सुक आहे. मात्र, या सामन्यात पाऊस विघ्न घालेल अशी भिती वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा…

Raj Thackeray : … तर महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा शिकवतील, राज ठाकरेंचा इशारा

Wine Sale : मॉल्समध्ये वाईन विक्रीसाठी भाजपची संमती आवश्यक, शिंदे गट करणार मनधरणी

ODI IND vs AUS : ‘डू ऑर डाई’ सामन्यात टीम इंडियात होणार बदल, पाहा संभाव्य प्लेइंग 11

हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. संध्याकाळी 7 ते 11 दरम्यान पाऊस पडू शकतो. अशा स्थितीत सामना झाला तर षटके कमी करण्यात येतील. नंतर दव पडण्याचीही शक्यता आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. विशेष म्हणजे नागपूरच्या मैदानात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहाजिकच प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल अशी शक्यता आहे. मात्र, नागपूरच्या मैदानाचा इतिहास लक्षात घेता. येथे खेळल्या गेलेल्या 12 सामन्यांपैकी 9 सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवत मालिकेत बरोबरी परून पुनरागमन करायचे असल्यास फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रकारात चांगली कामगिरी करणे बंधनकराक आहे.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. दुखापतीनंतर तो पुनरागमन करत आहे. अशा स्थितीत तो दुसऱ्या सामन्यात खेळणार हे निश्चित झाले आहे. पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि उमेश यादव हे वेगवान गोलंदाज चांगलेच महागात पडले होते. लेगस्पिनर युझवेंद्र चहललाही विशेष कामगिरी करता आली नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने किफायतशीर गोलंदाजी करताना नक्कीच 3 बळी घेतले. मात्र इतर कोणत्याही गोलंदाजाला आपली छाप सोडता आलेली नाही.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धचे उर्वरित 2 सामने प्रशिक्षक राहुल आणि कर्णधार रोहित शर्मासाठी महत्त्वाचे आहेत. नुकत्याच झालेल्या टी20 आशिया चषकातही संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. सुपर4 मध्ये संघाला श्रीलंका आणि पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक होणार आहे. अशा स्थितीत सर्व खेळाडूंची कामगिरी महत्त्वाची ठरते. त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित 2 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नियोजित 3 टी20 सामन्यात टीम इंडियाला आपली प्लेइंग 11 पक्की करावी लागणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना खास मेहनत घ्यावी लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी