29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाआयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्री करणार नवज्योत सिंग सिद्धू, लोकसभा निवडणूक लढवण्यास दिला...

आयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्री करणार नवज्योत सिंग सिद्धू, लोकसभा निवडणूक लढवण्यास दिला नकार

22 मार्चपासून आयपीएल 2024 (IPL 2024) ची सुरुवात होणार आहे. आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात खेळला जाणार आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांची आयपीएल मध्ये एन्ट्री होणार आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी लोकसभा निवडणुकीपासून स्वतःला दूर केले आहे. अनेक दिवसांपासून टीव्हीपासून दूर असलेला क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू आता आयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे.

22 मार्चपासून आयपीएल 2024 (IPL 2024) ची सुरुवात होणार आहे. आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात खेळला जाणार आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांची आयपीएल मध्ये एन्ट्री होणार आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी लोकसभा निवडणुकीपासून स्वतःला दूर केले आहे. अनेक दिवसांपासून टीव्हीपासून दूर असलेला क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू आता आयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे. (Navjot Singh Sidhu to do commentary in IPL 2024)

स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडिया वर पोस्ट शेयर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. सिद्धूच्या या धमाकेदार पुनरागमनाबद्दल स्टार स्पोर्ट्स म्हणते की नवज्योत सिंग सिद्धू देखील आमच्या स्टार कास्टमध्ये सामील झाला आहे. 22 मार्चपासून आयपीएल-2024 सुरू होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Sports India (@starsportsindia)

नवज्योतसिंग सिद्धू यांनी पत्नीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. पतियाळा येथून नवज्योतसिंग सिद्धू यांना उमेदवारी देण्याची काँग्रेसची तयारी होती, परंतु नवज्योतसिंग सिद्धू यांनी कर्करोगाने त्रस्त असलेल्या पत्नीच्या उपचारासाठी आणि खराब प्रकृतीचे कारण देत लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला.

‘नॅशनल क्रश’ Smriti Mandhana चा फिटनेस फंडा घ्या जाणून

दरम्यान, सिद्धू यांचा पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वाशी वाद सुरू असल्याचीही बातमी समोर आली आहे. ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. अफवांवर, सिद्धूच्या टीमने सांगितले की ते काँग्रेस आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. याचदरम्यान, नवज्योतसिंग सिद्धूने X वर त्याच्या हँडलवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबतचे त्यांचे जुने फोटो पुन्हा पोस्ट केले.

2004 मध्ये राजकारणात प्रवेश
सिद्धू हे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. पंजाब सरकारमध्ये ते मंत्रीही राहिले आहेत. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी सिद्धू भाजपमध्ये होते. 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते अमृतसरमधून खासदार म्हणून निवडून आले. 2014 पर्यंत ते या जागेवरून खासदार राहिले. 2016 मध्ये भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले. मात्र नंतर त्यांनी पक्ष सोडला. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसच्या तिकिटावर अमृतसर पूर्व मधून निवडणूक जिंकली. पण 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

BCCI ने दिली सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांना खूशखबर, केंद्रीय करारात केले सामील

राजकारणात येण्यापूर्वी सिद्धू क्रिकेटमध्ये होते. तो टीम इंडियाचा सलामीवीर राहिला आहे. त्याने 51 कसोटी सामने आणि 136 एकदिवसीय सामने खेळले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, त्याने कॉमेंट्री प्रवेश केला आणि तो त्याच्या वन-लाइनरसाठी ओळखला जाऊ लागला. कॉमेडी नाइट्स विथ कपिल आणि द कपिल शर्मा शो मध्ये तो दिसला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी