29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयसिल्व्हर ओकच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनी....अंबादास दानवेंवर मनसेचा पलटवार

सिल्व्हर ओकच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनी….अंबादास दानवेंवर मनसेचा पलटवार

मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे (Raj Thackeray )सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. चार दिवसांतील दुसऱ्या दिल्लीवारीमुळे त्यांच्या महायुतीमधील सहभागाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिल्लीच्या बादशाहच्या पाया पडायला गेले असतील. अशी टीका केली. त्यांच्या या टीकेला आता मनसे नेत्यांनी उत्तर दिले आहे. अंबादास दानवे तुम्ही विश्वप्रवक्त्यांची काय साफ करुन विरोधी पक्ष नेते झालात हे सगळ्यांनाच माहित आहे. अशा शब्दात मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दानवेंना सडेतोड उत्तर दिलं आहे. (Raj Thackeray Delhi Visit MNS leader Gajanan Kale criticism of Ambadas Danve)

काय म्हणाले गजानान काळे?

अंबादास दानवे तुम्ही विश्वप्रवक्त्यांची काय साफ करुन विरोधी पक्ष नेते झालात हे सगळ्यांनाच माहित आहे. तुमचे शिल्लक सेना प्रमुख दिल्लीश्वरांपुढे शेपूट घालून हिंदुत्वाबद्दल भ्र पण काढू शकले नाहीत. त्यामुळे सिल्व्हर ओकच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनी आदरणीय राजसाहेब ठाकरेंबद्दल न बोललेलं बरं. काही दिवसांपूर्वी धारावीला काही तरी मोर्चा काढला होता तुमच्या शिल्लकसेना प्रमुखांनी अशी आठवण करुन देत पुढे त्याचं काय झालं? असा सवाल उपस्थित केला आहे.

बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टाने बजावली अवमानाची नोटीस

तसेच, अदानीकडून कोणता तुकडा मिळाला की, मोर्चातल्या मागण्याबद्दल शिल्लकसेनाप्रमुख आणि आपण भ्र सुद्धा काढत नाही. तेव्हा आमच्या भानगडीत पडू नका. संभाजीनगरमधून आपल्या उमेदवारीचं होतं का ते पाहा आणि नंतरच बोला. असा धमकी वजा इशारा गजानान काळे यांनी दानवेंना दिला.

PM मोदींना धक्का; केंद्रीय मंत्रिमंडळातून बड्या नेत्याचा राजीनामा

अंबादास दानवे काय म्हणाले होते?

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. दिल्लीच्या बादशाहच्या पाया पडायला गेले असतील. राज ठाकरे भाजपासोबत जातील, असे होऊ शकत नाही आणि गेले तर काहीतरी देतील, एखादा तुकडा टाकतील, या शब्दांत अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केला. राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, अजून काय घडतेय ते पाहू. ते आताच गेले आहेत. नंतर यावर बोलू, असे दानवेंनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी