25 C
Mumbai
Tuesday, July 9, 2024
Homeक्रीडाप्रो कबड्डी लीग २१-२२ च्या सामन्यामधून पटना पायरेट्स बाहेर

प्रो कबड्डी लीग २१-२२ च्या सामन्यामधून पटना पायरेट्स बाहेर

टीम लय भारी

प्रो-कबड्डीच्या लीगची सुरूवात २०१४ मध्ये झाली. लीग सुरू झाल्यापासून, या खेळाच्या प्रेक्षकसंख्येमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. त्यादृष्टीने संघांची संख्याही वाढवण्यात आली आहे. या कबड्डी लीगमध्ये एकूण १२ संघ खेळतात(बाहेर  Pro Kabaddi League, Patna pirates dropped out of the game).

प्रो कबड्डी लीगच्या ८व्या हंगामाचा पहीला आठवडा पार पडला आहे. या पहिल्या आठवड्यात एकूण १२ सामने खेळले गेले. या सामन्यांमध्ये अनेक रोकॉर्ड मोडले व अनेक नवीन बनवलेही गेले. गत विजेते असलेल्या बंगाल वॉरियर्सने यावेळी चांगलीच सुरूवात केली. तेलुगू टायटन्स, तमिळ थलायवास आणि हरियाणा स्टिलर्स हे ही वेळी विजयाची वाट पाहत आहेत. सीझन २ चे चॅम्पियन यू मुंबा आणि तीन वेळा चॅम्पियन पटना पायरेट्स यांनाही दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

….तर सर्व आंबेडकरी जनता निवडणुकीत नोटा चा वापर करतील किंवा बहिष्कार घालतील….

राष्ट्रपित्यांविरूद्ध चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल

सर्वात आघाडीवर असलेला संघ दबंग दिल्लीने दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला व नंतर यू मुंबाला हरवून आपली खेळामध्ये आपली जागा जपून ठेवली. बंगाल वॉरियर्सने यूपी योद्धा व गुजरात जायंट्स या दोन्ही संगांचा पराभव करून अव्वल स्थान पटकावले.

Happy Birthday Salman Khan | एका सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल 6 महिने रिकामा बसून राहिला सलमान खान!

Pro Kabaddi League 2021: Naveen Kumar headlines opening week of PKL 8

यू मुंबा हे दबंग दिल्लसोबतच्या पराभवनंतर तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरात जायंट्सही सीझन १च्या चॅम्पियन जयपूर पिंक पँथर्सचा पराभव करून चौथ्या स्थानावर आहेत. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर पटना पायरेट्स ६ गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत. दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धा संघानेही पटनाचा पराभव करत संघाने पहिला विजय मिळवला. ते सहाव्या स्थानावर आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी