34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeक्रीडाFIFA विश्वचषक 2026चे वेळापत्रक जाहिर ! एकुण 48 संघ होणार सहभागी

FIFA विश्वचषक 2026चे वेळापत्रक जाहिर ! एकुण 48 संघ होणार सहभागी

उत्तर अमेरिकेत होणाऱ्या FIFA विश्वचषक 2026 (FIFA WC 2026) च्या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. FIFA ने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुढील विश्वचषक स्पर्धेत 4-4 संघांचे 12 गट असतील. यापूर्वी 3-3 संघांचे 16 गट तयार करण्याची योजना होती.

उत्तर अमेरिकेत होणाऱ्या FIFA विश्वचषक 2026 (FIFA WC 2026) च्या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. FIFA ने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुढील विश्वचषक स्पर्धेत 4-4 संघांचे 12 गट असतील. यापूर्वी 3-3 संघांचे 16 गट तयार करण्याची योजना होती. FIFA ने निवेदनात म्हटले आहे की, ‘नवीन फॉरमॅट हे सुनिश्चित करते की प्रत्येक संघाला विश्वचषकात किमान तीन सामने खेळण्याची संधी मिळेल आणि हे सामने पुरेशा विश्रांतीसह असतील.’

विशेष म्हणजे फिफा विश्वचषक 2026 मध्ये प्रथमच 48 संघ सहभागी होणार आहेत. क्रीडा जगतातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत आतापर्यंत केवळ 32 संघ सहभागी होत होते, ज्यांची 8 गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक गटात चार संघ होते आणि गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत पोहोचले.

हे सुद्धा वाचा

PHOTO: राज्यात लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी दिली बेमुदत संपाची हाक

हसन मुश्रीफ यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू

ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर काळाच्या पडद्याआड; मनोरंजनसृष्टीत शोककळा

आता फॉरमॅट असा असेल
अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणाऱ्या या विश्वचषकासाठी फिफाने सुरुवातीला ३-३ संघांचे गट तयार करण्याचे ठरवले होते, त्यापैकी प्रत्येक गटातून दोन संघ बाद फेरीत पोहोचणार होते. रवांडाची राजधानी किगाली येथे मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर 4-4 संघांना गटात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत अव्वल-2 संघांसह, सर्वोत्तम-8 तृतीय क्रमांकाचे संघ अंतिम-32 फेरीत पोहोचतील, तेथून बाद फेरीची सुरुवात होईल.

नव्या फॉरमॅटनुसार आता फिफा वर्ल्ड कपमध्ये एकूण 104 सामने खेळवले जाणार आहेत. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचणारे संघ 8-8 सामने खेळतील. FIFA वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 64 सामने खेळले गेले आहेत. 1998 पासून या स्पर्धेत 32 संघ सहभागी होत होते. 1998 पूर्वी फिफा विश्वचषक स्पर्धेत 24 संघ सहभागी होत असत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी