32 C
Mumbai
Wednesday, December 6, 2023
घरराजकीयगतिमान सरकार झाले ठप्प!

गतिमान सरकार झाले ठप्प!

राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषदा, शासनाचे अनुदान घेणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, शिक्षक व शिक्षकेतर अशा एकूण तब्बल 18 लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारले. राज्यात सर्व जिल्ह्यांत संप/आंदोलन 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. प्रत्येक जिल्ह्यातून भव्य मोर्चे काढून कर्मचाऱ्यांनी आपला बेमुदत संपाचा निर्धार व्यक्त केला. या संपामुळे सर्व कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे सरकारी यंत्रणा ठप्प झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. (Employees Strike)

राज्याच्या 36 जिल्ह्यांतील प्रशासकीय, शैक्षणिक आणि आरोग्यसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. कर्मचारी – शिक्षकांची ही एकजूट पाहून शासन आपला नकाराचा पवित्रा बदलून सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय तत्काळ घेईल, अशी अपेक्षा संघटनांमधून व्यक्त होत आहे.

अवकाळी पिक नुकसानीचे पंचनामे थांबलेले आहेत. वास्तविक जुनी पेन्शन योजना व इतर मागण्याबाबत शासकीय कर्मचारी, अधिकारी महासंघाने मागील 4-5 महिन्यापासून शासनाकडे निवेदने व विनंत्या केल्या आहेत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपावर जाण्याचा निर्णयही त्याचवेळी जाहीर केला होता. मात्र सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे. हा केवळ कर्मचारी यांचा प्रश्न नाही सर्व यंत्रणा ठप्प झाल्याने जनतेचे हाल होत आहेत. आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. तरी शासनाने या संपकऱ्यांशी संवाद साधावा, त्यांच्याशी चर्चा करावी आणि तोडगा काढण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

जुन्या पेन्शनचा मुद्दा कर्मचारी-शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्मचाऱ्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. जुन्या योजनेत जिथे दरमहा 16 हजार रुपये पेन्शन शक्य होती, तेथे केवळ 1,800 ते 2,200 रुपये इतकी अत्यल्प रक्कम कथित पेन्शनपोटी मिळणार आहे. सामाजिक सुरक्षेच्या नावावर मिळणारी ही रक्कम एक चेष्टा ठरणारी आहे. आयुष्याच्या उतरणीचा काळ समाधानकारक जावा, या दृष्टीने जुन्या पेन्शनचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजनाच सुरू करण्यात यावी, असा आग्रह धरत कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे.

हे सुद्धा वाचा : 

PHOTO: राज्यात लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी दिली बेमुदत संपाची हाक

18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; सरकारी विभागांचे कामकाज ठप्प

पुन्हा एकदा मुंबईत लाल वादळ धडकणार; राज्यात शेतकरी आंदोलनाचा एल्गार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी