महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी सरकार बदललं. मात्र, आजही सामान्य नागरिक शेतकरी आपल्या प्रश्नासाठी झगडत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. इकडे लाल वादळाने एकत्र येत पुन्हा सरकाराला घाम फोडण्यासाठी लाँग मार्चचं आयोजन केले. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिकहून मुंबईकडे मोर्चा काढला. (Farmers strike)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर आदिवासी शेतकरी बांधवांचा आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी मोर्चा पायी चालत जात आहे. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले असून नाशिक मुंबई महामार्गावर नाशिक हद्द पार केल्यानंतर कसाराजवळ ड्रोनच्या माध्यमातून लाल वादळाचं छायाचित्र टिपण्यात आलं आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी शेतकरी दिंडोरीपासून चालत मुंबईकडे निघाले आहेत.

अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) नेतृत्वाखाली या शेतकऱ्यांनी मंगळवारी त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी नाशिक ते मुंबई असा 200 किलोमीटरचा पदयात्रा पुन्हा सुरू केली आहे. कांदे, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, दूध आणि हिरडाच्या माफक किमतीसह 17 कलमी मागण्या मोर्चेकर्यांकडे आहेत. दरम्यान, आज (15 मार्च) दुपारी 3 वाजता होणारी शेतकरी लाँग मार्च प्रतिनिधींसोबतची बैठक राज्य सरकारने रद्द केली आहे.
दरम्यान, जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्संचयित करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारचे लाखो कर्मचारी मंगळवारी संपावर गेले, ज्यामुळे राज्य प्रशासनाच्या कामकाजात अडथळा येऊ शकतो आणि अनेक सेवांवर परिणाम होऊ शकतो. एक दिवस आधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी OPS मध्ये परत जाण्याच्या राज्य सरकारी कर्मचार्यांच्या मागणीकडे लक्ष देण्यासाठी वरिष्ठ नोकरशहांचा समावेश असलेल्या पॅनेलची घोषणा केली होती.
हे सुद्धा वाचा :
18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; सरकारी विभागांचे कामकाज ठप्प
PHOTO: राज्यात लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी दिली बेमुदत संपाची हाक