27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeराजकीयमटण देऊन शक्ती दाखवली जात नाही... उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले रिंगणात

मटण देऊन शक्ती दाखवली जात नाही… उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले रिंगणात

मटण देऊन शक्ती दाखवली जात नाही अशं विधान करत बिग बॉस फेम अभिनेते अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) उदयनराजेंविरोधात रिंगणात उतरले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून बिचुकले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माध्यामांशी संवाद साधताना बिचुकले यांनी उदयनराजेंवर टीकास्त्र सोडले. तसेच, 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहितीदेखील यांनी यावेळी दिली. तसेच, खासदार म्हणून निवडून आल्यावर कोणती कामे करणार असल्याची घोषणादेखील त्यांनी यावेळी केली. (abhijit bichukale against udayanraje bhosale satara lok sabha)

नुकतंच भाजपने सातारा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली. बऱ्याच काळाच्या प्रतिक्षेनंतर भाजपनं उदयनराजे यांनी तिकीट जाहिर केल. भाजपच्या या भूमिकेवर बिचुकले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले बिचुकले?

भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची उदयन दादांची इच्छा होती, ती पूर्ण झाली. पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी पण करावे असा सल्ला बिचुकले यांनी दिला. शरद पवार आणि उदयनराजेंचं हाडवैर आहे. मी या सगळ्यांमध्ये एकटा लढतोय त्यामुळे यावेळी मला संधी द्या, असं आवाहनही बिचुकले यांनी यावेळी केलं.

माढ्यातील राजकीय घडामोडींना वेग, फडणवीसांच्या भेटीनंतर जानकर पवारांच्या भेटीला; काय झाली चर्चा?

2004, 2009, 2014, 2019 च्या निवडणुकीत मला चांगला पाठिंबा दिला. आता देखील मी निवडणूक अर्ज दाखल केला असून मतदारराजा जागृत झाला पाहिजे असे अभिजित बिचुकलेंनी म्हटले. दोन रुपयाची दारू पाजून, मटण देऊन शक्ती प्रदर्शन केलं जात नाही असा टोलाही बिचकुलेंनी राजकारण्यांना लगावला.

राम नवमीदिवशी राज ठाकरेंची खास पोस्ट, श्रीरामाचं अस्तित्व नाकारणाऱ्या पक्षांवार डागली तोफ

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्या ही मागणी मी केली होती. समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक होण्याबाबत पाठपुरावा करणार आहे. पाच वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले.पण, स्मारकाची एक विटही रचली नसल्याची टीका बिचुकलेंनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून माझ्या पाठिशी उभे राहा असे आवाहन बिचुकलेंनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी