28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
HomeराजकीयShahajiBapu Patil | गद्दार, खोकेबहाद्दर की विकासपुरूष ? | Gantaprao Deshmukh

ShahajiBapu Patil | गद्दार, खोकेबहाद्दर की विकासपुरूष ? | Gantaprao Deshmukh

लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी नुकताच सांगोला विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला(Activists of Shahjibapu Patil became somewhat aggressive.). आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चीकमहूद या गावी तुषार खरात यांनी भेट दिली. गावातील सामान्य लोकांच्या भावना जाणून घेत असताना यावेळी शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाले. आमच्याही प्रतिक्रिया घ्या, मुलाखती घ्या, असा आग्रह शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी नुकताच सांगोला विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला(Activists of Shahjibapu Patil became somewhat aggressive.). आमदार शहाजीबापू पाटील(shahajibapu patil) यांच्या चीकमहूद या गावी तुषार खरात यांनी भेट दिली. गावातील सामान्य लोकांच्या भावना जाणून घेत असताना यावेळी शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाले. आमच्याही प्रतिक्रिया घ्या, मुलाखती घ्या, असा आग्रह शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

शहाजीबापू पाटील सांगोल्यात परतले अन् म्हणाले, बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो

यावेळी दिवंगत गणपतराव देशमुख व विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. दोन्हीही कार्यकर्ते आपापली बाजू नेटाने लावून धरत होते. शहाजीबापू पाटील यांची राज्यभरात गद्दार, खोकेबहाद्दर अशी प्रतिमा तयार झाली असल्याचे संपादक तुषार खरात यांनी विचारले असता, शहाजीबापू पाटील यांनी भरपूर कामे केल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. भाजपने शरद पवार व बाळासाहेब ठाकरे या दोन मराठी माणसांचे पक्ष फोडल्याकडे तुषार खरात यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे हे अडिच वर्षे घरातच बसून होते.

हे तर चोरांचे विधिमंडळ, राऊतांच्या विधानावर भाजपचा हल्लाबोल

शरद पवार राजकारण करतात, असे शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते म्हणाले. यावेळी माण – खटावमधील आमदार जयकुमार गोरे यांच्या गुंडगिरीचा उल्लेख संपादक तुषार खरात यांनी केला. शहाजीबापू पाटील यांच्या गावात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते लोकशाही पद्धतीने विचार मांडत आहेत. पण माण – खटाव मतदारसंघात अशा पद्धतीने विचार मांडण्याची सोय नाही, असा उल्लेख तुषार खरात यांनी केला. यावर शहाजीबापू पाटील यांचे कार्यकर्ते खवळले. माण – खटावच्या आमदारांविषयीचे प्रश्न त्यांच्या मतदारसंघात विचारा. आमच्या मतदारसंघात कशाला विचारता असा सवाल शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला. तर कै. गणपतराव देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार देशात कुठेही फिरू शकतात. कोणाही बद्दल प्रश्न विचारू शकतात. माण – खटाव मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातच येतो. त्यामुळे माणविषयी या ठिकाणी प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही, अशी भावना देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Shetkari Samvad Yatra : शहाजी बापूंच्या मतदार संघात आदित्य ठाकरेंना तुफान प्रतिसाद

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी