28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअजित पवारांची अवस्था 'आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना' !

अजित पवारांची अवस्था ‘आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना’ !

राज्य बँक, सिंचन घोटाळ्याची चौकशी करा, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन अजित पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचे अधिकार कापून त्यांना वेगळ्या पद्धतीने धडा शिकवला आहे. म्हणून की काय, अजित पवारांची अवस्था ‘आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना’ ! अशी झाली आहे.

राज्य बँक, सिंचन घोटाळ्याची चौकशी करा, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडिया आघाडीच्या बैठकीआधी दिले. हे कमी म्हणून की काय, शासन कार्यनियमावलीच्या दुसऱ्या अनुसूचित निर्दिष्ट केलेली सर्व प्रकरणे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री (अजित पवार) यांच्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ( देवेंद्र फडणवीस) यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करावेत,असा निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिला, असा आदेश मुख्य सचिवांनी काढला आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्याकडून निघालेल्या फाईलचा प्रवास थेट मुख्यमंत्र्यांकडे न होता, आधी तिला फडणवीस यांच्या कार्यालयाचा थांबा घ्यावा लागेल. हा अजित पवार यांची ‘पॉवर’ कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.

गेल्या पंधरवड्यात अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत शिरत मुख्यमंत्र्यांना चेकमेट देण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी लगाम घालत ‘माझ्या राज्यात पवारपर्व चालणार नाही,’ असा ‘वेगळा’ संदेश दिला आहे. त्यामुळे अजित पवारांची अवस्था ‘आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना’ ! अशी झाली आहे. २ जुलै २०२३ रोजी अजित पवार आपल्या ८ आमदारांना ( त्यातले तीन वादग्रस्त, ईडी भीतीपोटी आलेले) घेऊन भाजपची वाट धरली. अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ तर घेतली. पण खाते मात्र न मिळाल्याने अनेक दिवस हे मंत्री ओसाड गावची पाटीलकी करत होते. अखेर दिल्लीतून संदेश येताच खाते वाटप होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. पण अजित पवार यांना अर्थ खाते मिळणार म्हणून शिंदे गटाचे आमदार नाराज होते. त्यांची समजूत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काढल्यावर मंत्र्यांचे खातेवाटप झाले.

हे सुद्धा वाचा 

एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
जालन्यातील घटनेचे राज्यभर पडसाद! पहा कुठे काय झालं?
मराठा आंदोलनकर्ते संतापले; अहमदनगर, सोलापूरसह नंदुरबार जिल्ह्यात बसफेऱ्या बंद

पण अर्थ खात्याचे मंत्री झाल्यावर राज्याची तिजोरी आपल्याच हातात आली आपण मुख्यमंत्री ओडसोडून काही पावले दूर आहोत, या थाटात अजित पवार यांनी अर्थ खात्यासह विविध खात्यांच्या सचिवांच्या बैठकांचा सिलसिला सुरू केला. अजित पवार यांची पॉवर वाढत चालली आहे. याची कुणकुण एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना आली. त्यामुळेच त्यांनी अजित पवार यांचे पंख छाटणे मोहीम सुरू केली. दुसरीकडे अजित पवार यांच्यामुळे आपल्या भोवती संशयाचे धुके दाटले त्यामुळे शरद पवार यांनी थेट मोदी यांच्यावर बॉम्ब टाकला. पण यात बिकट अवस्था झालीय ती अजित पवार यांची.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी