28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयमास्क न लावणाऱ्यांना सभागृहाबाहेर काढा : अजित पवार

मास्क न लावणाऱ्यांना सभागृहाबाहेर काढा : अजित पवार

टीम लय भारी

मुंबई :२०२१ च्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. देशामध्ये सुरू असणाऱ्या सर्वच शंकांवर या अधिवेशनामध्ये चर्चा होणार. कोरोना हे एक देशावर मोठे संकट आहे. देशपातळीवर तसेच राज्यपातळीवर ही योग्य त्या युती लावल्या जात आहेत. देशपातळीवर रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे. देशामध्ये गांभिर्याने विचार व निर्णय घेतले जात आहेत, मात्र ते निर्णय सर्वच गांभिऱ्यांने घेत नाहीत.( ajit pawar erupted over not wearing a mask in assembly)

सभागृहामध्ये काही ठराविक सदस्यच मास्क घालतात, तर बाकी जण अजिबात मास्क घालत नाहीत. अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केली. अजित पवार म्हणाले की, काही जणांना मास्क घाला बोलता येत नाही. परंतु बोलूनही मास्क लावला पाहिजे. किती वाईट परिस्थिती आहे हे माहीत सर्वांना आहे पण कोणालाही याचा अंदाज नाही.

Ajit Pawar : अजित पवारांची मोठी घोषणा ! पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार

महापालिका निवडणुका लांबणार, अजित पवारांचे संकेत; ओबीसी जनगणना झाल्यावरच रणधुमाळी

बाह्यदेशामध्ये दिड दिवसाला रुग्णसंख्येमध्ये दुप्पट वाढ होत आहे. नेहमी कोरोनाचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. मास्क न लावणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढा. मास्क घातला नाही तर कितीही कोणी प्रयत्न केले तरी हे संकट नियंत्रणात येणार नाही. सभागृहामध्ये जे काही होते त्या सगळ्या गोष्टी बाहेर व्हायरल होतात, हे लक्षात ठेवा. असे त्यांनी सांगितले.

देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट झाले आहेत. देशामध्ये १४ राज्यांत एकूण २२० हून अधिक जणांना ओमायक्रॉन ची बाधा झाली आहे. तरी लोक नवीन व्हेरिएंटबाबत गंभीर असल्याचे दिसत नाहीत. कोरोना निर्बंधाच्या सूचना लोकांनी पाळल्या नाही तर पुन्हा कडक निर्बंध, लॉकडाऊनसारखी परिस्थिती होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar : कोरोनामुक्त अजित पवार मंत्रालयात अ‍ॅक्शन मोडमध्ये

Maharashtra: Fadnavis, Patole unite to corner Raut and Ajit Pawar on disconnection of street lights

केंद्र सरकारने राज्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये राज्यांची परिस्थिती पाहून त्वरीत नाईट कर्फ्यू आणि कंटेनमेंट झोन सारखे उपाय करण्यासाठी अलर्ट रहावे असे म्हटले आहे. रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली असेल तरी कोणत्याही रुग्णाला आयसीयूमध्ये जावे लागलेले नाही याचा दिलासा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी