30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेत कार्यकर्त्यांना सुनावले खडेबोल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेत कार्यकर्त्यांना सुनावले खडेबोल

टीम लय भारी

पुणे : या व्यासपीठावर मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील बसलो आहोत. आम्ही पण मराठ्याच्या पोटीच जन्माला आलो आहोत ना. मग आम्हाला आमच्या जातीचा आणि समाजाचा अभिमान नाही का? असे भर सभेत अजित पवारांनी सुनावले आहे(Ajit Pawar slams young man raising question of maratha reservation).

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अजित पवार भाषण करत होते. किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. अजित पवार यांचं भाषण सुरु असताना ते ओबीसी आरक्षणाबाबत बोलत होते. तितक्यात खाली बसलेल्या गर्दीतून एका तरूणाने सर्वांदेखत मराठा आरक्षणावरून अजित पवार यांना जाब विचारायला सुरुवात केली.

यावेळी अजित पवार यांनी तरुणाला शांत बसवायचा प्रयत्न केला. तरीही हा तरूण बोलतच होता. तेव्हा अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी म्हटले की, तुम्हाला मी मगाशी बोलून दिले आहे. ही बोलायची पद्धत नव्हे. तुम्ही कोणाची सुपारी घेऊन आलायत का, अशा शब्दांत अजित पवार यांनी संबंधित तरुणाला चांगलेच झापले.

हे सुद्धा वाचा

संजय राऊताच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन : अजित पवार

पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताच भ्रष्टाचार नाहीय! अजित पवारांचं किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर

“मी फार छोटा माणूस…” असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर लगावला टोला

Need to remove 50% cap to facilitate quota to Marathas: Ajit Pawar

मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? असा संतप्त प्रतिप्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत केला. शिवनेरी गडावर आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमातील सभेत अजित पवार बोलत होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या एकाने मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांना विचारणा केली. त्यावेळी अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. पण मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. यामधील कायेदशीर बारकावेही लक्षात घेतले पाहिजेत, असे अजित पवार यांनी म्हटले.

बाळसााहेब थोरात, सीताराम कुंटे, मुख्यमंत्री आणि मी असे चार-पाचजण पंतप्रधानांना भेटलो. आम्ही पंतप्रधानांकडे १२ मागण्या केल्या. त्यातील मराठा आरक्षणाची पहिली मागणी होती. पंतप्रधानांनी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं, असेही अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी पवारांनी संभाजीराजे छत्रपती यांनीही मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या उपोषणाच्या भूमिकेवर फेरविचार करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी