21.6 C
Mumbai
Friday, January 27, 2023
घरराजकीय'गेल्या चार महिन्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या'

‘गेल्या चार महिन्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या’

अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत, पीक विम्या कंपन्यांची दादागिरी, राज्यातून गेलेले उद्योग, मंत्र्यांचे समोर आलेले भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी अंतिम हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Legislature Winter Session 2022)आठवडा प्रस्तावावरील भाषणाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरले. गेल्या ४ महिन्यात विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच (Farmer Suicide) प्रमाण वाढल्याचे दानवे यावेळी म्हणाले.

एकीकडे शेतकरी अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी पंचनामे जलदगतीने करा असा टाहो फोडत असताना त्यासाठी सरकारने २ महिन्यांचा कालावधी लावला. शेतकऱ्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली असता कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली. अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी लावण्यात आलेले रेंज गेज हे शेतकऱ्यांना मदत मिळू नये म्हणून लावले का असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला.
सरकारने केलेल्या मदतीच्या घोषणा या खोट्या व तुटपुंज्या असल्याचा आरोप दानवे यांनी करत संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घ्यावी अशी मागणी दानवे यांनी केली. राज्यात असलेल्या पाचही पीक विमा कंपन्या या शेतकऱ्यांना लुटून नफा कमवितात, त्यांच्या दादागिरीला चाप लावणे गरजेचं असल्याचे दानवे यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा 

अजित पवार यांचा विधानसभेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव

धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ हजार रुपये बोनस; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने सडून गेलेली पिकं, फळबागांचे नुकसान याकडे दानवे यांनी सरकारचे लक्ष वेधले, सरकार शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष देईल का अस प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. हा महाराष्ट्र गायरान जमिनी, नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरण आधीचे भूखंड खाण्यासाठी आहे का की सर्व सामन्यांचा महाराष्ट्र हे सिद्ध करण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले.

नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरण भूखंडप्रकरणी चार प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. तसेच या प्रकरणात लाचलुचपत विभागाने प्रधान सचिव नगरविकास यांना पत्र लिहून कल्पना दिली असताना याबद्दल तत्कालीन नगरविकास मंत्री व आताचे मुख्यमंत्री यांना माहिती कशी नाही हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे दानवे यांनी म्हटले. महाजनको या कंपनीत कोल वॉशरीज मध्ये ५ हजार ५०० कोटी मूल्य किंमतीचा कोल हा २ हजार २०० कोटी रुपयांना विकण्यात आला असल्याचा घोटाळा झाल्याचे म्हणत दानवे यांनी चौकशी करण्याची मागणी केली.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!