35 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeक्रिकेटमोहम्मद शमी विजयाचा शिल्पकार; न्यूझीलंडविरोधात 'सत्ते पे सत्ता' खेळी

मोहम्मद शमी विजयाचा शिल्पकार; न्यूझीलंडविरोधात ‘सत्ते पे सत्ता’ खेळी

देशात आयसीसी वर्ल्डकप (ICC Worldcup 2023) अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे या वर्ल्डकपमध्ये अधिकच रंगत निर्माण होत आहे. या विश्वचषकात आता टीम इंडियाने अंतिम सामन्याचे दार उघडत प्रवेश केला आहे. (१५ नोव्हेंबर) दिवशी न्यूझीलंड आणि टीम इंडियामध्ये सेमी फायनल (India Vs New Zealand) सामना झाला. टीम इंडियाने नाणेफेकी जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाने ३९७ धावा करत ३९८ धावांचे लक्ष न्यूझीलंडला दिले. याच सामन्यात भारतातील विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा ५० शतक पूर्ण करत रेकॉर्ड मोडीत काढला आहे. तर कर्णधार रोहित शर्माने षटकार ठोकत वर्ल्डकपमधील सर्वाधिक षटकार मारल्याचा विक्रम केला. तर गोलंदाजीत शमीने (Mohammad Shami) ७ गडी बाद करत न्यूझीलंड संघाच्या नाकी नऊ आणले.

टीम इंडियाने ३९८ धावांचे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघास दिले होते. न्यूझीलंडने सुरुवातीला चांगली कामगिरी केली. कॉनवेच्या वैयक्तिक १३ धावा झाल्या असताना शमीने बाद केले. न्यूझीलंडविरुद्ध सेमी फायनलमध्ये शमीची ही पहिली विकेट होती. तर रचीन रवींद्रच्या १३ धावा झाल्या असताना शमीने दुसरा रचिन रविंद्रला बाद केले. त्यानंतर टॉम लाथमला वैयक्तिक खाते न उघडून देता बाद केले. केन विल्यम्सनने वैयक्तिक ६९ धावा केल्या आणि शमीने त्याला झेलबाद केले. साउदी फर्ग्युसनने शुल्लक धावा करत तंबूचा रस्ता धरला. मिशेल सँटनरला देखील शमीने झेलबाद केले आहे. यावेळी शेवटचा विकेट देखील शमीने घेतला असून ३२७ धावांवर न्यूझीलंड संघ ऑल आऊट झाला. या सात विकेट्स घेण्याआधी शमीने केन विल्यम्सनचा झेल सोडला होता. यावेळी वानखेडे स्टेडियम गपगार झाले होते. मात्र या बदल्यात मोहम्मद शमीने ७ गडी बाद करत वानखेडेवर प्रेक्षकांना आणि जगाला ‘सत्ते पे सत्ता’ खेळ दाखवला.

हेही वाचा

विराटची शतकी खेळी; अखेर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत

रोहित शर्माच्या एका षटकाराने विश्वविक्रम

नाना पाटेकरांनी चाहत्याच्या कानाखाली काढला जाळ?

सेमी फायनल सामन्यात शमीने ७ विकेट्स पटकावल्याने त्याला मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आले असून विजयाचा दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. यावेळी त्याने सुटलेल्या झेलबाबत सांगितले. तो म्हणाला की, ‘माझ्याकडून झेल सुटला तेव्हा मी फार घाबरलो होतो. काय करावे काही कळेनासे झाले होते. मात्र तरीही मी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. मैदानावर दुपारी फलंदाजी चांगली होते. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी सकारात्मक आहे. रात्री या खेळपट्टीवर धुके पडते आणि फलंदाजीसाठी अवघड होऊन बसते’.

शमीची शक्कल

या सामन्यात चेंडू फलंदाजाच्या पुढ्यात टाकून फलंदाजांना मारण्यासाठी प्रवृत्त करायचे यामुळे झेल उडण्याची शक्यता असते. हेच मी या सामन्यात केले. मागील काही वर्ल्डकपमध्ये आम्ही सेमी फायनलमध्ये पराभूत झालो. यावेळी आम्ही सर्वस्व पणाला लावले असून शेवटपर्यंत सामना सोडला नाही, असे वक्तव्य शमीने केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी