35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीय'देवेंद्र फडणविसांनीच शाहू महाराजांचे कान भरले, छत्रपतींची अवहेलना केली'

‘देवेंद्र फडणविसांनीच शाहू महाराजांचे कान भरले, छत्रपतींची अवहेलना केली’

टीम लय भारी 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून संभाजीराजे यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राजेंनी निवडणूकीतून माघार घेतली. त्यानंतर शाहू महाराज यांच्या पत्रकार परिषदेने पुन्हा एकदा राळ उठली. या संपूर्ण प्रकरणावर देवेंद्र फडणविसांनीच शाहू महाराजांचे कान भरले, छत्रपतींची अवहेलना केली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote यांनी केली. (Anil Gote criticizes Devendra Fadnavis)

खा. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची कपटी व कारस्थानी चाल बेमालूमपणे अलगद उघडी पाडली. छत्रपती शाहू महाराजांनी आधीच फडणवीसांचा कावेबाजपणा उघडा पाडला होता. खा. संजय राऊत यांनी कोल्हापूर दोऱ्याच्या दरम्यान छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली. छत्रपतींना फडणवीसाप्रमाणे पंजे करण्याची आवश्यक्ताच नाही. त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात भाजपाचे कपटी डावपेच जनतेसमोर मोकळेपणे उघड केले,असे अनिल गोटे म्हणाले.

'देवेंद्र फडणविसांनीच शाहू महाराजांचे कान भरले, छत्रपतींची अवहेलना केली'

आपली चाल व अंगभूत असलेले कपटी कारस्थानी वृत्ती जगजाहीर झाल्याने त्यांचा जळफाट झाला. संतापात ते बालून गेले. ‘कुणी तरी किडक्या मेंदूच्या व्यक्तीने छत्रपतीपर्यंत चुकीची माहिती पोचवली., देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याने छत्रपतींची सरळ-सरळ अवहेलना झाली आहे. याचा अर्थ असा होतो की, कोल्हापूरचे छत्रपती हलक्या कानाचे आहेत. सांग्या-वांग्या गोष्टीवर निर्णय घेतात. ते स्वतःचा विचार करू शकत नाहीत. जसे कान भरले तसे निर्णय छत्रपती निर्णय घेतांना व वागतात. फडणवीसांचे हे वक्तव्य छत्रपती महाराजांची अहवेलना करणारे तर आहेच पण अतिशय अवमान कारक आहे. समस्त मराठा समाजाचे दैवत असलेल्या राज घराणाचा फडणवीसांनी अवमान करून आपली उच्च वर्णीय श्रृद्र मनोवृत्ती दर्शवीली आहे, असे अनिल गोटे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना माझे जाहीर आवाहन आहे की, ज्या वेळेस आपणास सवडं असेल तेव्हा सांगाल त्या ठिकाणी मी समोरा-समोर चर्चेला येतो. तुमचा बद्दल वापरलेली सर्व विशेषणे कशी चपराक आहेत हे माझ्या स्वतःच्या अनुभवा वरून सिद्ध करून देईल! एक जरी विशेषणे चुकीचे वापरल्याचे सिद्ध करून दिले तर, राजकारण तर, सोडून देईनच ! पण जन्मभर पायात चप्पल घालणार नाही. जनते समोर जाहीर माफी मागेल. सन्यास घेऊन निघून जाईन! तुम्ही फक्त प्रामाणिकपणे कबूल करा ! या शिवाय माझी जास्त अट नाही. तुम्ही अतिशय कपटी, आतल्या गाठीचे, धोकेबाज, खोटारडे, कारस्थानी, लबाड, नीच मनोवृत्तीचे, केसाने गळा कापणारे विश्वासघातकी आहात हे सिद्ध करून देईन ! सत्याचा एक अंश जरी आपल्यात असेल तर, माझे आव्हान स्विकारून ! होवून जाऊदे एकदा हा सूर्य आणि हा जयंद्रय! असे अत्यंत आरोप घणाघाती करणारे सरळ फडणवीसांना आव्हान देणारे स्फोटक पत्रक आज राष्ट्रवादीचे जेष्ठ उपाध्यक्ष तथा भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी लिहिले आहे.


हे सुद्धा वाचा :

अनिल परबांच्या घरी ईडीची छापेमारी,आता भाजप नेत्यांना टिकेसाठी खुले मैदान

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम; अनाथ, गोरगरीब, वृद्ध, अपंग यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

बांगलादेश मुक्ती लढ्यात नरेंद्र मोदी सहभागी होते, तर बाबरी मस्जिद पाडण्यात फडणवीस निश्चितच अग्रेसर होतेच : अनिल गोटे

‘कोल्हापूरात कुणी हुंगत नसलेले चंद्रकांत पाटील दिवसाढवळ्याच बरळून राजकारणातील विनोदी विषय ठरलेत’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी