32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयअनिल परब आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक

अनिल परब आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक

टीम लय भारी

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज देखील विरोधकांनी सकाळीच पायऱ्यांवर निर्दशने केली. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक दिसून आलेत. सरकारला घेण्याची विरोधकांनी तयारी केली होती. त्याचवेळी सत्ताधारीही आक्रमक दिसून आले. परिवहनमंत्री अनिल परब आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यात प्रश्नोत्तराच्या तासात शाब्दिक चकमक दिसून आली(Anil Parab and Nitesh Rane, a verbal clash between them). 

वाशी येथील परिवहन कार्यालयातील वाहनांचा कर वसूल करण्याबाबत भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी प्रश्न विचारला. त्यावर परिवहन मंत्री अनिल परब उत्तर देत होते. त्यात मध्येच नितेश राणे बोलले. त्यानंतर अनिल परबांचा आवाज चढला आणि त्यांनी नितेश राणेंना सुनावले. परब म्हणाले, मला मंगलप्रभात लोढा यांनी प्रश्न विचारला. मी त्यांना उत्तर आधी देतो. तुम्ही तुमच्या जागेवर जा. जिथे जागा आहे तिथे जाऊन बसा. त्यानंतर नितेश राणे देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होणार?

महाराष्ट्र विकणं यांना चहा विकण्यासारखं वाटलं का -अमोल मिटकरी

अध्यक्षांनी हस्तक्षेप करत नितेश राणेंना जागेवर बसण्यास सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंचा सीट क्रमांक सांगा, अशी विचारणा अध्यक्षांना केली. सीट नंबर तुम्ही नाहीतर आम्ही देतो, असं फडणवीस म्हणाले.

एसटी संपात 57 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या वारसदारांना नोकरी देणार का? असा प्रश्न भाजप आमदार श्वेत महाल्ले यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना परिवहन मंत्री म्हणाले, ”एसटीच्या 57 कर्मचारी आत्महत्या केली. त्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. याबाबत माहिती घेत आहोत. आत्महत्या कशामुळे झाल्या? हे तपासणार जाणार असं अनिल परब म्हणाले.

मंत्रालयात एमटीडीसीच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलं नवं केंद्र

Ramdas Kadam accuses Shiv Sena ministers Anil Parab, Uday Samant of trying to finish off party by colluding with NCP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी