31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयअरविंद केजरीवालांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता; ४ किलो वजन घटलं

अरविंद केजरीवालांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी व्यक्त केली चिंता; ४ किलो वजन घटलं

कथित अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगचा आरोप ठेऊन ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांना अटक केली. २१ मार्च रोजी त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होत. काल झालेल्या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशातच, गेल्या १५ दिवसांपासून कोठडीत असणाऱ्या मुख्यमंत्री केजरीवालांबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. तुरुंगात रवानगी झाल्यापासून केजरीवाल यांचं वजन घटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Arvind Kejriwal lost 4.5kg weight since his arrest)

आम आदमी पक्षाने दावा केला आहे की, केजरीवाल यांच्या वजनात घट झाली आहे. त्यांचे वजन ४ किलोनं घटलं आहे. पण तिहार तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीबाबत कुठलीही चिंता नाही. त्यांना अटत केली होती तेव्हा त्याचे वजन ५५ होते आणि आताही ५५ असल्याचे तुरुंग प्रशासनानं म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमागची Inside Story

अरविंद केजरीवाल यांना तिहारमधील तुरुंग क्रमांक 2 मधील 14X8 फूट खोलीत ठेवण्यात आले आहे. केजरीवाल यांना डायबेटिसचा त्रास आहे. त्यामुळं त्यांच्या प्रकृतीवर तिहार तुरुंग प्रशासनांच विशेष लक्ष आहे. जर केजरीवाल यांच्या शरिरात ग्लुकोमीटर, इसबगोल, ग्लुकोज आणि साखरेचं प्रमाण जर कमी झालं तर वैद्यकीत अधिकारी काळजी घेत आहेत. तर निरिक्षकांच्या मते केजरीवालांच्या प्रकृतीवर तुरुंगातील वैद्यकीय चिकित्सक नजर ठेऊन आहेत.

केजरीवाल यांच्या अटकेनंतर पत्नी सुनीता यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाल्या….

केजरीवाल यांनी घरचा डबा खाण्याची मुभा देण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अरविंद केजरीवाल यांच्या खोलीजवळ आपत्कालीन प्रतिसाद दल तैनात केल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे.
तुरुंगाच्या नियमानुसार त्यांना आज सकाळी नाश्त्यासाठी साखर नसलेला चहा आणि ब्रेड देण्यात आला. यानंतर त्यांनी वर्तमानपत्र वाचले आणि काही काळ दूरदर्शनही पाहिले. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. असही तुरुंग प्रशासनानं सांगितलं आहे.

माझे जीवन…, अटकेनंतर अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

केजरीवाल यांच्यासह बीआरएसच्या नेत्या के. कविता, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर मद्य धोरण घोटाळ्याचे कारस्थान रचल्याचा ईडीचा आरोप आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी