30 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरमुंबईआता विनातिकीट प्रवाशांना बसणार डिजिटल फटका!

आता विनातिकीट प्रवाशांना बसणार डिजिटल फटका!

मध्य रेल्वेच्या एका निर्णयाने प्रवासी व टीसींमधील वाद टाळता येणार आहे. टीसींना क्यूआर कोड दिला जाणार आहे. यामुळे टीसीसह प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल प्रवास जसजसा सर्वसामान्यांकरिता खुला होऊ लागला तसतसे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या वाढू लागली आहे. विनातिकीट प्रवास करताना किंवा पास नूतनीकरण करायला विसरल्यास दंडाची रक्कम भरण्यास आता अधिकृतपणे डिजिटल पर्याय उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेने स्थानकांवर कार्यरत तिकीट तपासणीसांना क्यूआर कोड देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रोख रकमेअभावी दंड भरण्यास येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रवासी आणि टीसी यांच्यातील वाद टाळता येणे शक्य होणार आहे. यामुळे विनाटिकीट फिरणाऱ्यांवर चांगलाच जाब बसणार आहे. (Central Railway TC will get QR code for digital fine)

चहाच्या टपरीवाल्यापासून ते फलाटावरील बूट पॉलिशवाल्यापर्यंत सगळे आपल्या व्यवसायासाठी डिजिटल पेमेंट अर्थात यूपीआयच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करत आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाने दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी तिकीट तपासणीसांना रोख रक्कम घेण्याच्या सूचना केल्या होत्या. अनेकदा रोख रक्कम नसल्याने प्रवासी आणि टीसी यांच्यात वाद होत होते. यावर उपाय म्हणून टीसींनी फलाटावरील खाद्यपदार्थ विक्रेता स्टॉलधारकांच्या क्यूआर कोडवर व्यवहार पूर्ण करण्यास सांगत होते. पैसे जमा झाल्याची खात्री झाल्यानंतर दंडाची रक्कम टीसी स्टॉलधारकांकडून घेत होते. या द्राविडी प्राणायामामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जात होता.

मध्य रेल्वे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी करार करून एक खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या रेल्वे खात्याचा क्यूआर कोड टीसीना दिला जाणार आहे. रेल्वेतील टीसीचा क्रमांकांची नोंदणी करण्यात येईल. दंडाची रक्कम खात्यात झाल्याचा मेसेज टीसीच्या नोंदवलेल्या क्रमांकावर प्राप्त होईल. यामुळे प्रवासी आणि टीसी या दोघांच्या वेळेत बचत होईल.

एप्रिलअखेर हे क्यूआर कोड देण्याचा प्रयत्न आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १२०० तिकीट तपासणीस आहेत. यापैकी स्थानकावर कार्यरत असलेल्या टीसींना क्यूआर कोड देण्यात येणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : पालिकेला अखेर मुहूर्त सापडला; तीन वर्षांनी हिमालय पादचारी पूल रेल्वे प्रवाशांसाठी खुला

प्रवाशांसाठी खुशखबर! एकाच कार्डवर करा मोनो, मेट्रो, रेल्वे आणि बसमधून प्रवास

VIDEO : रेल्वे रुळांमध्ये आणि भोवती खडी का असते जाणून घ्यायचेय…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी