27 C
Mumbai
Wednesday, February 28, 2024
Homeराजकीयलोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता : अशोक चव्हाण

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता : अशोक चव्हाण

राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, विधान परिषदेच्या निवडणुकीतील वातावरण पाहता राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला भिती वाटू लागली आहे म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळल्या जात आहेत. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाही एकत्रितच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. आगामी वर्ष हे महत्वाचे आहे. अमरावती व नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेचा विजय झाला असून ही विजयाची पहिली पायरी आहे. आता आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच लागा असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. (Ashok Chavan Said Lok Sabha, Vidhan Sabha Elections Are Also Likely To Be Combined)

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी चव्हाण बोलत होते. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण तसेच राज्यभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, नेते उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले, यांनी विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व आपल्यामध्ये कोणतेही वाद नाहीत आम्ही एकत्रच आहोत. मात्र नागपूर व अमरावतीतील पराभवाकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी भाजपाने आमच्यात मतभेद असल्याचे वातावरण निर्माण केले व माध्यमांनी त्याला हवा दिली असे सांगितले.

हे सुद्धा वाचा

राज्यातील दिव्यांगांचे होणार सर्वेक्षण; महामंडळाला ५०० कोटींचे भागभांडवल, कर्जवाटप होणार

VIDEO : जम्मू-काश्मीरमधील मुलींनी सुरेल आवाजात गायले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ !

सत्यजीत तांबे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी कामाचा माणूस ओळख सिद्ध केली !

यावेळी अमरावती पदवीधर मतदारंसघातून विजयी झालेले धीरज लिंगाडे व नागपूर शिक्षक मतदार संघातून विजयी झालेले सुधाकार आडबाले यांचा सत्कार करण्यात आला तसेच राहुल गांधी यांच्या सोबत कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील भारत जोडो पदयात्रींचा गौरव करण्यात आला. या बैठकीची माहिती नंतर पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी